नवी दिल्ली : शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी पुन्हा कोलकात्यातील तीन ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान ईडीला अर्पिता मुखर्जीच्या बेलघरिया येथील दुसर्या फ्लॅटमधून सुमारे 29 कोटी रोख (28.90 कोटी रुपये) आणि 5 किलो सोने मिळाले. हे पैसे मोजण्यासाठी ईडीच्या टीमला सुमारे 10 तास लागले. धक्कादायक बाब म्हणजे अर्पिताने हे पैसे फ्लॅटच्या टॉयलेटमध्ये लपवले होते.
#WATCH | West Bengal: Hugh amount of cash, amounting to at least Rs 15 Crores, recovered from the residence of Arpita Mukherjee at Belgharia.
She is a close aide of West Bengal Minister Partha Chatterjee. pic.twitter.com/7MMFsjzny1
— ANI (@ANI) July 27, 2022
अशातच एएनआय वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या ट्विटरनुसार आज तपासात अर्पिता मुखर्जीच्या घरातून किमान १५ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात ईडीने नुकतेच पश्चिम बंगालमधील ममता सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली होती. अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय असेलेल्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून तब्बल २० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच या कारवाईत सर्व मौल्यवान वस्तू मिळाल्या होत्या. अर्पिताला ईडीने २३ जुलै रोजी अटक केली होती.
यातच ईडीच्या या कारवाईपासून विरोधी पक्ष पार्थ चॅटर्जी यांना टीएमसीच्या मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी करत आहेत. तसेच शिक्षक भरती घोटाळ्यातील मनी ट्रेलची चौकशी करणाऱ्या ईडीने पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष टीएमसी आमदार माणिक भट्टाचार्य यांचीही चौकशी केली आहे.