लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त डॉ. नेने यांनी माधुरी दीक्षितसाठी शेअर केली खास पोस्ट

Madhuri Dixit And Shriram Nene | अभिनेत्री माधुरी दीक्षित बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखले जाते. माधुरी दीक्षितने १७ ऑक्टोबर १९९९ रोजी डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. आज अभिनेत्री तिच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने दोघांनी रोमँटिक पोस्ट शेअर करत एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रीराम नेने यांनी एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी अनेक जुने फोटो शेअर केले आहेत. तसेच एका कार्यक्रमात डॉ. नेने माधुरीला लग्नाची मागणी घालताना पाहायला मिळत आहेत. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, “दोन हृदयं जी कायम एकत्र असतात. माझी साथीदार, माझी प्रियकर तुला २५ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा! माझ्यासाठी तू या ग्रहावरची सर्वात सुंदर स्त्री आहेस. तुझं मन खूप मोठं आहे आणि तुझं स्मितहास्य खूपच सुंदर आहे.” Madhuri Dixit And Shriram Nene |
View this post on Instagram
“आता जवळपास अर्ध आयुष्य आपण एकत्र काढलंय. आपल्या आयुष्यातील ही सगळी वर्षं खूपच सुंदर होती. मुलांना एकत्र वाढवणं… एकत्र मजा करणं सगळं काही सुंदर आहे. आता इथून पुढे एकमेकांना अशीच कायमस्वरुपी साथ देऊयात”. या जोडप्यावर लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. Madhuri Dixit And Shriram Nene |
दरम्यान, माधुरी सोशल मीडियावर नेहमी तिच्या कुटुंबाबद्दलच्या अनेक गोष्टी शेअर करत असते. याशिवाय डॉ. नेने देखील इन्स्टाग्रामवर सक्रिय आहेत. या जोडप्याला अरिन आणि रयान अशी दोन मुलं आहेत. माधुरीच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच ‘भुल भुलैय्या ३’ मध्ये झळकणार आहे.





