बीएसएफच्या आणखी 25 जवानांना संसर्ग
Updated On:

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलातील आणखी 25 जवानांना कोविड -19 या आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे “बीएसएफ’मधील रुग्णांची संख्या 42 वर पोचली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दिल्लीतील जामा मशिद आणि चांदनी महाल येथे तैनात करण्यात आलेल्या “बीएसएफ’च्या 126 व्या बटालियनमध्ये हे नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
या तुकडीतील 6 जणांना करोनाची लागण झाल्याचे शनिवारी उघड झाले असल्याचे “बीएसएफ’च्या प्रवक्त्याने शनिवारी सांगितले. या तुकडीमध्ये एकूण 94 जवान आहेत आणि त्यांच्यापैकी 5 जणांच्या चाचणीचे रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहेत, असेही या प्रवक्त्याने सांगितले.
आतापर्यंत “बीएसएफ’च्या 42 जवानांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे, त्यात दिल्लीतील आर के पुरममधील युनिटच्या हॉस्पिटलमधील काही आणि त्रिपुरामधील दोन रुग्णांचाही समावेश आहे, असे प्रवक्त्याने सांगितले.





