“धर्माच्या नावाखाली निष्पाप…” ; पहलगाम हल्ल्यानंतर दिल्ली जामा मशिदीच्या शाही इमामांची मोठी घोषणा

Syed Ahmed Bukhari । जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. हल्ल्यावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर दुसरीकडे सरकारने देखील पाकिस्तानची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या हल्ल्याबाबत दिल्ली जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचे निवेदन समोर आले आहे. त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यासाठी त्यांनी, ‘पहलगाममध्ये निष्पाप लोकांच्या हत्येने आपली अंतरआत्मा हादरवून टाकला आहे. संपूर्ण देश या भयंकर गुन्ह्याचा एकमताने निषेध करतो.” असे म्हटले आहे.
“धर्माच्या नावाखाली निष्पाप लोकांना मारणे हा अक्षम्य गुन्हा” Syed Ahmed Bukhari ।
शाही इमाम यांनी आपल्या निवेदनात, “धर्माच्या नावाखाली निष्पाप लोकांना मारणे हा एक अक्षम्य गुन्हा आहे.”असे म्हटले. त्यांनी “या हल्ल्याला ‘अक्षम्य गुन्हा’ म्हणत अशा क्रूरांना कठोर शिक्षा झाली पाहिजे” अशी मागणी केली. इमाम बुखारी यांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला तसेच, “मी त्यांच्या दुःखात त्यांच्यासोबत उभा आहे.”असे म्हटले. अहमद बुखारी यांनी यावेळी “ते येत्या शुक्रवारी जामा मशिदीतून या संदर्भात घोषणा करतील. धर्माच्या नावाखाली होणारा हिंसाचार हा केवळ धर्माचा अपमान नाही तर मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा गुन्हा आहे.” असे म्हटले आहे.
धर्माच्या नावाखाली हिंसाचार आम्ही सहन करणार नाही – अजमेर शरीफ प्रमुख
दुसरीकडे, अजमेर शरीफ दर्ग्याचे प्रमुख सय्यद जैनुल आबेदीन यांनीही या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे.एका वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात त्यांनी या दहशतवादी हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “इस्लाममध्ये या भ्याड कृत्याला कोणतेही स्थान नाही. आपल्या धर्माच्या शिकवणीनुसार, जर एकाही निष्पाप व्यक्तीचा मृत्यू झाला तर तो मानवतेचा अपमान आहे. अशा घटनांमुळे धर्म आणि इस्लामची बदनामी होते, तर इस्लाम अशा प्रकारची हिंसा शिकवत नाही.”
On #PahalgamTerroristAttack, Syed Ahmed Bukhari, Shahi Imam of Delhi’s Jama Masjid, says, “The killing of innocent people in Pahalgam has shaken our conscience. The whole of India condemns it in one voice…” pic.twitter.com/hDpTM4knK6
— ANI (@ANI) April 23, 2025
ते पुढे म्हणाले, “आपल्या पूर्वजांनी हे कधीच शिकवले नाही. माझ्या दृष्टीने, जो कोणी निष्पापांचे रक्त सांडतो तो मुस्लिम म्हणवून घेण्यास पात्र नाही. कोणता धर्म शिकवतो की तुम्ही एखाद्याच्या धर्माबद्दल विचाराल आणि नंतर त्यांच्यावर गोळीबार कराल? किमान देवाच्या क्रोधाचे भय बाळगा. निष्पापांना मारणे हे पाप आहे. असे भ्याड कृत्य करणारा कोणीही मुस्लिम म्हणवून घेण्यास पात्र नाही.”
काय म्हणाली विनय नरवालची पत्नी हिमांशी? Syed Ahmed Bukhari ।
नौदल अधिकारी विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी यांनी सांगितले होते की, त्यांच्या पतीच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या कारण ते मुस्लिम नव्हते. ते व्हायरल झाल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. शाही इमाम यांनीही या प्रकरणी निवेदन दिले आहे. उल्लेखनीय आहे की विनय नरवाल यांचे अंतिम संस्कार बुधवारी हरियाणातील कर्नाल येथे करण्यात आले.





