पुणे जिल्हा | घोडेगावच्या न्यायालयात २३६ प्रकरणे निकाली

मंचर, (प्रतिनिधी) – घोडेगाव (ता.आंबेगाव) येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात दिवाणी प्रकरणी ८ व फौजदारी प्रकरणे २२८ प्रकरणी असे एकूण २३६ प्रकरणे निकाली काढण्यात आली, अशी माहिती घोडेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद काळे यांनी दिली.
घोडेगाव येथे लोकन्यायालय संपन्न झाले. पॅनल सदस्य म्हणून अॅड. प्रतीक गोडसे व अॅड. भूषण शिंदे यांनी कामकाज पाहिले. यावेळी घोडेगाव न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. एन. हुरगट, सह दिवाणी न्यायाधीश एम.एस.माळी, घोडेगाव वकील संघाचे अध्यक्ष प्रमोद काळे, घोडेगाव वकील संघाचे सदस्य आणि न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
दिवाणी प्रकरणी ८ व फौजदारी प्रकरणे २२८ प्रकरणी, असे एकूण २३६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच दाखल पूर्व ३ हजार ८६८ दावे निकाली निघाले. त्यानुसार एकून २ कोटी ८४ लाख ७९ हजार ६१३ रुपयांची वसुली झाली असल्याचे सांगण्यात आले.





