चक्रिवादळामुळे मिसिसिपीत 23 ठार ! वीज पुरवठा खंडीत, गारपिटीचाही फटका

रोलिंग फोर्क – मिसिसिपीमध्ये धडकलेल्या भीषण चक्रिवादळामुळे किमान 23 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी आलेल्या या चक्रिवादळामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले असून मोठ्या भूभागातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. दक्षिणेकडील अनेकराज्यांमध्ये गारांचा पाऊस देखील झाला असून या गारा गोल्फच्या चेंडूच्या आकाराच्या होत्या असे मिसिसिपी आपत्कालीन यंत्रणेने म्हटले आहे. या वादळामुळे डझनभर जखमी झाले असून 4 जण बेपत्ता झाले असल्याचेही आपत्कालिन यंत्रणेने म्हटले आहे.
वादळानंतर अनेक ठिकाणी मदत आणि बचाव पथके पाठवण्यात आली आहेत. तर अनेक ठिकाणी अन्य बचाव पथके देखील पाठवण्यात आली असल्याचे आपत्कालिन यंत्रणेने म्हटले आहे. या वादळामुळे 60 मैलांच्या परिसरात नुकसान झाले असल्याचे ‘नॅशनल वेदर सर्व्हिसेस’ने म्हटले आहे.
जॅकसनच्या इशान्येकडील भाग, मिसिसिपी, सिल्व्हर सिटीचा ग्रामीण भाग आणि रोलिंग फोर्क आदी भागांमध्ये या चक्रिवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. या भागांमध्ये नुकसान केल्यानंतर हे वादळ राक्षीच्यावेळी अल्बामामध्ये विनोओ आणि अमोय या शहरांमध्ये गेले.
आपत्कालिन यंत्रणेने केवळ “स्वतःला सुरक्षित ठेवा.’ अशा ट्विटच्या आधारे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मिसिसिपीचे गव्हर्नर टेट रिव्ह यांनीही आपत्कालिन यंत्रणेला सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. हवामान शास्त्र विभागाने आगामी आठवड्यारात अनेक बागांमध्ये वादळ, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे.





