Pakistan News : बैसाखी निमित्त २,२०० शीख भाविक पाकिस्तानात दाखल
पाकिस्तानमधील वार्षिक बैसाखी मेळ्यात सहभागी होण्यासोबतच भारतातील शीख गुरुद्वारा जन्मस्थान, ननकाना साहिब आणि करतारपूर साहिबलाही भेट देतील.

Pakistan – बैसाखी उत्सव आणि ३२७ व्या खालसा जन्मदिन महात्सवासाठी भारतातून २,२०० शीख भाविक आज अटारी वाघा सीमेवरून पाकिस्तानमध्ये दाखल झाले.
पाकिस्तानातल्या पंजाब प्रांताचे अल्पसंख्याक मंत्री रमेश सिंग अरोरा आणि इव्हॅक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डचे अतिरिक्त सचिव (तीर्थस्थान) नासिर मुश्ताक यांनी वाघा सीमेवर यात्रेकरूंचे स्वागत केले.
या महिन्यात १४ एप्रिल रोजी होणाऱ्या बैसाखी उत्सवासाठी पाकिस्तानने भारतातील २,८०० शीख यात्रेकरूंना व्हिसा दिला आहे. त्यापैकी २,२३८ भाविकांनी आज अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानच्या सीमेमध्ये प्रवेश केला.
बैसाखीचा मुख्य समारोह १४ एप्रिल रोजी लाहोरपासून ४०० किलोमीटर अंतरावर असलेल्या हसन अदालत येथील गुरुद्वारा पंजा साहिब येथे होणार आहे.
पाकिस्तानमधील वार्षिक बैसाखी मेळ्यात सहभागी होण्यासोबतच भारतातील शीख गुरुद्वारा जन्मस्थान, ननकाना साहिब आणि करतारपूर साहिबलाही भेट देतील.
या भाविकांच्या वाहन, आरोग्य आणि सुरक्षेसाठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असल्याचे इटीपीबीचे नासिर मुश्ताक यांनी सांगितले.





