रायगडमध्ये 1725 कोटींचे ड्रग्ज जप्त
Updated On:

रायगड – रायगडमधील न्हावाशेवा बंदरातून तब्बल 1725 कोटी रुपयांचे 22 टन हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने केली आहे. एका कंटेनमधून हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांची ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या दोन नागरिकांना अटक केली होती. या दोघांची चौकशी केली असता अनेक खुलासे समोर आले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी 1200 कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले होते. त्यांची अजून चौकशी करण्यात आली असता, मुंबईच्या बंदरावरही एक कंटेनर असल्याचे समोर आले होते.





