India – China: भारत चीन यांच्यात कमांडर पातळीवर चर्चेची २१ वी फेरी
Updated On:

India – China: पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनच्या शिष्टमंडळात सोमवारी चुशुल-मोल्डो सीमेवर बैठक झाली. कमांडर पातळीवरील ही चर्चेची २१ वी फेरी होती. त्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या परिसरात जे मतभेदाचे मुद्दे निर्माण झाले आहेत त्यावर लक्ष केंद्रीत करून चर्चा करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
ही चर्चा मैत्रीपुर्ण आणि सौहार्दपुर्ण वातावरणात झाली आणि त्यात दोन्ही बाजूंनी आपले मुद्दे उपस्थित केले. या आधीची म्हणजे २० वी बैठक ९-१० ऑक्टोबर रोजी झाली होती.
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, भारताने चीनबद्दलच्या आपल्या दीर्घकालीन भूमिकेचा पुनरुच्चार करताना म्हटले आहे की दोन्ही देश आपसात निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राजकीय आणि लष्करी पातळीवर चर्चा करीत आहेत.





