‘रेव्ह पार्टीत 21 मुले तर 14 मुली सापडल्या’ आयोजक दक्षिणच्या दिग्गज नेत्याचा ‘नातेवाईक’

तेलंगणातील सायबराबादमध्ये रेव्ह पार्टीचा पर्दाफाश झाला आहे. एका हायप्रोफाईल छाप्यात फार्महाऊसवर रेव्ह पार्टी करणाऱ्या ३५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या रेव्ह पार्टीचे कनेक्शन केटीआरच्या जवळच्या लोकांशी जोडले जात आहे.
माहितीनुसार, तेलंगणाचे माजी मंत्री केटी रामाराव (KTR) यांचे नातेवाईक मानल्या जाणाऱ्या राज पकाला यांच्या जनवाडा फार्महाऊसवर टाकलेल्या हाय-प्रोफाइल छाप्यात अवैध दारू आणि ड्रग्जचा वापर उघड झाला आहे. ही कारवाई नरसिंगी पोलिस, स्पेशल ऑपरेशन टीम (एसओटी) आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केली. मकिला पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या फार्महाऊसमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर छापा टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले.
रात्री उशिरा झालेल्या या छाप्यात अधिकाऱ्यांनी पार्टीत उपस्थित असलेल्या 35 जणांना ताब्यात घेतले, त्यात 21 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश होता. तपासादरम्यान 10.5 लिटर विदेशी दारूच्या सात बाटल्या आणि परवाना नसलेल्या भारतीय दारूच्या दहा बाटल्याही जप्त करण्यात आल्या. हे राज्याच्या उत्पादन शुल्क कायद्याचे उल्लंघन आहे.
संशयाच्या आधारे, अधिकाऱ्यांनी पार्टीत उपस्थित लोकांची ड्रग टेस्ट केली, ज्यामध्ये विजय मदुरी नावाच्या व्यक्तीला कोकेन पॉझिटिव्ह आढळून आले. मदुरीला पुढील चाचण्यांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून एनडीपीएस कायद्याच्या कलम 27 नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फार्महाऊस मालक राज पाकला यांच्या विरोधात कलम 34(A), 34(1) आणि उत्पादन शुल्क कायद्याच्या कलम 9 अंतर्गत परवान्याशिवाय मद्य सेवा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर फार्महाऊसवर अवैध दारू पुरवठा आणि अंमली पदार्थांचा वापर याप्रकरणी कसून चौकशी सुरू करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.





