2025 Highest Paid actress: ‘नेशनल क्रश’ रश्मिका मंदाना – 2025 मध्ये बॉक्स ऑफिसची ठरली ‘क्वीन’! चार चित्रपटांतून कमावले तब्बल ₹1275 कोटी

2025 Highest Paid actress : 2025 हे वर्ष बॉलिवूड आणि साऊथ सिनेमासाठी विशेष ठरले. अनेक मोठ्या आणि छोट्या बजेटच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर रश्मिका मंदानाचे नाव झळकत आहे.
रश्मिकाने या वर्षी चार मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं आणि या चारही चित्रपटांच्या एकत्रित कमाईने तिने तब्बल ₹1275 कोटींचा आकडा पार केला. विशेष म्हणजे तिच्या एका चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपयश पाहिलं, तर दुसरा फक्त सरासरी ठरला. तरीही तिच्या एकूण कमाईचा आकडा सर्वाधिक ठरला.
वर्षाची धमाकेदार सुरुवात ‘छावा’ने
फेब्रुवारी 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ या विक्की कौशल अभिनीत चित्रपटात रश्मिकाने दमदार भूमिका साकारली. या चित्रपटाच बजेट सुमारे ₹150 कोटी होता, तर त्याने जगभरात ₹807.88 कोटींची कमाई केली. भारतातच या चित्रपटाने ₹716.88 कोटींचा गल्ला जमवला. रश्मिकाच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं आणि वर्षाची सुरुवातच सुपरहिट ठरली.
‘सिकंदर’ ठरला फ्लॉप
यानंतर मार्च महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘सिकंदर’ या चित्रपटाने मात्र निराशा दिली. जवळपास ₹200 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने फक्त ₹185.50 कोटी वर्ल्डवाइड कमाई केली. हा चित्रपट पूर्णपणे अपयशी ठरला.
तेलुगू फिल्म ‘कुबेरा’ राहिला सरासरी
जून महिन्यात आलेला रश्मिकाचा तेलुगू चित्रपट ‘कुबेरा’ ने मध्यम यश मिळवलं. या चित्रपटाच बजेट ₹100 कोटी होता आणि याने भारतात ₹106.50 कोटी तर जगभरात ₹138.60 कोटी कमावले. चित्रपट सरासरी ठरला असला तरी रश्मिकाच्या लोकप्रियतेत वाढ झाली.
दिवाळीत ‘थामा’ने पुन्हा गाजवलं बॉक्स ऑफिस
दिवाळीच्या निमित्ताने आलेल्या ‘थामा’ या चित्रपटाने रश्मिकासाठी वर्षाचा शेवट सोन्याहून पिवळा केला. ₹140 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात ₹125.75 कोटी आणि जगभरात ₹143.75 कोटी कमावले. सध्या या चित्रपटाची कमाई अजूनही सुरू आहे.
चारही चित्रपटांतून तब्बल ₹1275 कोटींची कमाई
या सर्व चित्रपटांच्या एकत्रित कमाईनंतर रश्मिका मंदाना ही 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री ठरली आहे. तिच्या अभिनयामुळे ती केवळ साऊथ इंडस्ट्रीतच नव्हे तर बॉलिवूडमध्येही स्थिर झाली आहे.
रश्मिका सध्या चाहत्यांच्या आवडीची अभिनेत्री ठरत असून, तिच्या आगामी चित्रपटांची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आधीच वाढली आहे.





