दमदार फीचर्ससह नवी हिरो करिझ्मा भारतीय बाजारात लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

2025 Hero Karizma XMR 210 Launched | हिरो मोटोकॉर्पने आपली लोकप्रिय स्पोर्ट बाइक करिझ्मा XMR 210 चे दोन नवीन हाय-स्पेक व्हेरियंट भारतात लाँच केले आहेत. 2025 मॉडेल वर्षाच्या अपडेट्सचा भाग म्हणून हे मॉडेल्स काही नव्या फीचर्ससह सादर करण्यात आले आहेत. यात एक नवीन टॉप व्हेरियंट आणि एक ‘कॉम्बॅट एडिशन’चा समावेश आहे.
या नवीन 2025 Hero Karizma XMR 210 मॉडेल्सची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे 2 लाख रुपये आणि 2.02 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर बेस व्हेरियंट 1.81 लाख रुपयांना उपलब्ध आहे.
नवीन 2025 Hero Karizma XMR 210 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
2025 करिझ्मा XMR मध्ये आता ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि नवीन TFT कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेमुळे रायडरला कॉल-मेसेज अलर्ट, बॅटरी स्टेटस आणि म्युझिक कंट्रोल करता येईल. याशिवाय टॉप व्हेरियंट आणि कॉम्बॅट एडिशनमध्ये USD फ्रंट फोर्क्स देण्यात आले आहेत. कॉम्बॅट एडिशनमध्ये ग्रे आणि ब्लॅक रंगासह येलो हायलाइट्स असून, त्यामुळे बाईकला अधिक स्पोर्टी लूक मिळतो.
या बाईकमध्ये 210cc लिक्विड-कूल्ड DOHC इंजिन देण्यात आले असून, हे इंजिन 9,250 rpm वर 25 bhp पॉवर आणि 7,250 rpm वर 20.4 Nm टॉर्क निर्माण करते. जुन्या मॉडेलपेक्षा यामध्ये इंजिन काही बदल करण्यात आले आहेत.
दरम्यान, फेब्रुवारी 2025 मध्ये जुन्या करिझ्मा XMR 210 च्या एकाही यूनिटची विक्री झाली नाही. तर फेब्रुवारी 2024 मध्ये याच बाईकचे 2,128 युनिट्स विकले गेले होते. विशेष म्हणजे नोव्हेंबर 2024 नंतर या बाईकची एकही विक्री झालेली नाही. त्यामुळे आता नवीन 2025 Hero Karizma XMR 210 ला ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


