नवी दिल्ली – २०२४ हे वर्ष भारतीय खेळाडूंसाठी खूप व्यस्ततेचे असणार आहे. २०२४ मध्ये होणार्या पॅरिस ऑलिम्पिकच्या दृष्टीने हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. क्रिकेटमधील टी-२० विश्वकरंडकापासून ते फुटबॉलमधील एफसी आशियाई करंडकापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये यंदा भारतीय खेळाडू आपले कौशल्य पणाला लावताना दिसणार आहेत. त्याचबरोबर ख्रिस्तियानो रोनाल्डोसारखे दिग्गज खेळाडू युरोपातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेतील युरो कपमध्ये दिसणार आहेत. त्याचबरोबर विश्वकरंडक विजेता अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी कोपा अमेरिका या दक्षिण अमेरिकन स्पर्धेत आपली प्रतिभा दाखविताना दिसणार आहे.
ऑलिम्पिक ही या वर्षातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी जास्तीत-जास्त पदके जिंकण्याकडे भारताचे लक्ष असणार आहे.
यंदा क्रिकेटचे तीन विश्वकरंडक
भारतातील क्रिकेटप्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांचे यंदा तीन विश्वकरंडक स्पर्धांमधून मनोरंजन होणार आहे. याची सुरुवात अंडर-१९ विश्वकरंडकाने होणार आहे. १९ जानेवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत तो खेळला जाईल. त्यानंतर ४ ते ३० जून दरम्यान अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी टी-२० विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. एकदिवसीय विश्वकरंडकातील पराभवानंतर टीम इंडियाची नजर ही स्पर्धा जिंकण्याकडे आहे. त्याच वेळी, महिला टी-२० विश्वकरंडक वर्षाच्या अखेरीस बांगलादेशमध्ये होणार आहे.
यंदा चार मोठ्या फुटबॉल स्पर्धा
यंदा वर्षाची सुरुवात दोन मोठ्या फुटबॉल स्पर्धांनी होणार आहे. आफ्रिकन कप ऑफ नेशन्स आयव्हरी कोस्ट येथे १३ जानेवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. त्याच वेळी, एएफसी आशियाई करंडक १२ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान कतारमध्ये खेळवला जाईल. ही स्पर्धा सुरुवातीला चीनमध्ये होणार होती, पण नंतर तिचे यजमानपद कतारला देण्यात आले.
रोनाल्डोचा अखेरचा युरो कप?
युरो करंडक १४ जून ते १४ जुलै दरम्यान जर्मनीमध्ये खेळवला जाईल. यात क्रिस्टियानो रोनाल्डो, कायलियन एमबाप्पे, करीम बेन्झेमा आणि रॉबर्ट लेवांडोस्की, मार्कस रॅशफोर्ड, टोनी क्रूझ, हॅरी केन आणि ज्यूड बेलिंगहॅम सारखे स्टार खेळाडू असतील. रोनाल्डो शेवटच्या वेळी पोर्तुगालच्या जर्सीमध्ये युरो कप खेळताना दिसू शकतो. त्याने २०१६ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळवला होता.
मेस्सी कोपा अमेरिकाचे विजेतेपद राखणार?
२० जूनपासून कोपा अमेरिका स्पर्धा सुरू होणार आहे. अमेरिकेतील विविध शहरांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत दक्षिण अमेरिकेतील संघ दिसणार आहेत. त्यांच्याशिवाय उत्तर अमेरिकेतील काही संघांनाही स्थान देण्यात आले आहे. लिओनेल मेस्सी, नेमार ज्युनियर, व्हिनिसियस ज्युनियर, एंजल डी मारिया आणि एमिलियानो मार्टिनेझ सारखे खेळाडू या स्पर्धेत दिसणार आहेत. लिओनेल मेस्सीचा संघ अर्जेंटिना गतविजेता म्हणून प्रवेश करेल. त्याची नजर जेतेपदाच्या रक्षणावर आहे.
चार ग्रँडस्लॅम स्पर्धा
दरवर्षीप्रमाणे यंदा टेनिसच्या चार ग्रँडस्लॅम स्पर्धा जगाच्या विविध कोपऱ्यांमध्ये रंगणार आहेत. वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा १४ ते २८ जानेवारी दरम्यान ऑस्ट्रेलियात खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियन ओपननंतर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये फ्रेंच ओपनचे आयोजन करण्यात येणार आहे. फ्रेंच ओपन २० मे ते ९ जून दरम्यान होणार आहे. तिसरा ग्रँडस्लॅम म्हणजे विम्बल्डन. जी १ ते १४ जुलै दरम्यान लंडनमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्याच वेळी, वर्षातील शेवटचे ग्रँडस्लॅम यूएस ओपन २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.
ऑलिम्पिकच्या तिकिटांसाठी चुरस रंगणार आहे
२६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता स्पर्धा आणि चाचण्या जानेवारीपासूनच सुरू होतील आणि जूनपर्यंत चालणार आहेत. ऑलिम्पिकमुळे देशातील क्रीडा उपक्रम शिगेला पोहोचणार आहेत. महिला हॉकी पात्रता स्पर्धा १३ जानेवारीपासून रांची येथे होत आहे. इंडिया ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धा १६ ते २१ जानेवारी दरम्यान नवी दिल्ली येथे होणार आहे. या स्पर्धेद्वारे ऑलिम्पिकसाठी रँकिंग गुण जोडले जातील.
वेळापत्रक
जानेवारी : झिम्बाब्वेचा श्रीलंका दौरा (६ ते १८ जानेवारी); अफगाणिस्तानचा भारत दौरा (११ ते १७ जानेवारी); एएफसी आशियाई करंडक २०२३ (१२ जानेवारी ते १० फेब्रुवारी); पाकिस्तानचा न्यूझीलंड दौरा (१३ ते २१ जानेवारी); एफआयएच हॉकी ऑलिम्पिक पात्रता (१३ ते १९ जानेवारी); १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वकरंडक २०२४ (१३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी); इंडिया ओपन (१४ ते २१ जानेवारी); ऑस्ट्रेलिया ओपन २०२४ (१४ ते २८ जानेवारी); वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलिया दौरा (१७ जानेवारी ते १३ फेब्रुवारी); हिवाळी युवा ऑलिंपिक २०२४ (१९ जानेवारी ते २ फेब्रुवारी); इंग्लंडचा भारत दौरा (२५ जानेवारी ते ११ मार्च)
फेब्रुवारी : डेव्हिस कप (२ फेब्रुवारी ते २५ नोव्हेंबर); न्यूझीलंडचा दक्षिण आफ्रिका दौरा (४ ते १७ फेब्रुवारी); ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंड दौरा (२१ फेब्रुवारी ते २४ मार्च); बहरीन जीपी (फेब्रुवारी २९ ते मार्च २).
मार्च : सौदी अरेबिया जीपी (७ ते ९ मार्च); ऑस्ट्रेलिया जीपी (२२ ते २४ मार्च); इंडियन प्रीमियर लीग २०२४ (२९ मार्च ते २६ मे)
एप्रिल : जपान जीपी (एप्रिल ५ ते ७); सॅफ ज्युनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप (१२ ते १४ एप्रिल); चीन जीपी (एप्रिल १९ ते २१)
मे : मियामी जीपी (मे ३ ते ५); एमिलिया रोमाग्ना (१७ ते १९ मे); फ्रेंच ओपन (२० मे ते ९ जून); पाकिस्तानचा इंग्लंड दौरा (२२ ते ३० मे);
मोनॅको जीपी (मे २४ ते २६); झिम्बाब्वेचा इंग्लंड दौरा (२८ ते ३१ मे)
जून : यूएफा चॅम्पियन्स लीग फायनल (१ जून); टी-२० पुरुष क्रिकेट विश्वकरंडक (४ ते ३० जून); कॅनडा जीपी (जून ७ ते ९); युएफा युरो २०२४ (जून १४ ते १४ जुलै); कोपा अमेरिका (२० जून ते १४ जुलै); स्पेन जीपी (२१ ते २३ जून); ऑस्ट्रिया जीपी (२८ ते ३० जून);
टूर डी फ्रान्स (२९ जून ते २१ जुलै)
जुलै : विम्बल्डन (१ ते १४ जुलै); युनायटेड किंगडम जीपी (५ ते ७ जुलै); यूएफा चॅम्पियन्स लीग (९ जुलै ते ३१ मे); वेस्ट इंडिजचा इंग्लंड दौरा (१० ते ३० जुलै); हंगेरी जीपी (१९ ते २१ जुलै); बेल्जियम जीपी (२६ ते २८ जुलै); पॅरिस ऑलिम्पिक २०२४ (जुलै २६ ते ११ ऑगस्ट)
ऑगस्ट : श्रीलंका इंग्लंड दौरा (२१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर); नेदरलँड जीपी (ऑगस्ट २३ ते २५); यूएस ओपन (२६ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर)
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ (ऑगस्ट २८ ते सप्टेंबर ८) इटली जीपी (३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर)
सप्टेंबर : ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा (११ ते २९ सप्टेंबर); अझरबैजान जीपी (१३ ते १५ सप्टेंबर); भारतीय जीपी (२० ते २२ सप्टेंबर)
सिंगापूर जीपी (२० ते २२ सप्टेंबर); बांगलादेशचा भारत दौरा (तारीख नक्की नाही); टी-२० महिला विश्वकरंडक २०२४ (अद्याप तारिख ठरलेली नाही)
ऑक्टोबर : सॅफ वरिष्ठ ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप (४ ते ६ ऑक्टोबर); फिफा यू-१७ महिला विश्वकरंडक (१६ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर); यूएस जीपी (ऑक्टोबर १८ ते २०); मेक्सिको जीपी (ऑक्टोबर २५ ते २७); भारताचा न्यूझीलंड दौरा (अद्याप तारिख नाही)
नोव्हेंबर : ब्राझील जीपी(१ ते ३ नोव्हेंबर); डब्लूटीए फायनल (३ ते १० नोव्हेंबर); एटीपी फायनल्स (नोव्हेंबर १० ते १७); लास वेगास जीपी (नोव्हेंबर २१ ते २३); डेव्हिस कप फायनल (२५ नोव्हेंबर); सय्यद मोदी इंडिया इंटरनॅशनल (२६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर)
कतार जीपी (२९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर)
डिसेंबर : अबू धाबी जीपी (डिसेंबर ६ ते ८); वेस्ट इंडिजचा महिला भारत दौरा; भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (अद्याप तारिख नाही);