Pakistan News : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात २० दहशतवाद्यांना अटक

Pakistan News : पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या संघटनांशी संबंधित २० दहशतवाद्यांना अटक केली आहे. यामध्ये शीख, तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानशी अर्थात टीटीपी संबंधित दहशतवाद्यांचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.
गुप्तचरांकडून मिळालेल्या १६२ गोपनीय माहीतींच्या आधारे पंजाब प्रांतातल्या विविध ठिकाणी छापे घालून ही कारवाई करण्यात आली, असे पंजाब पोलिसांच्या काऊंटर टेरेरिझम डिपार्टमेंटच्या प्रवक्त्याने निवेदनामध्ये म्हटले आहे.
मनमोहन सिंग, नकीबुल्लाह आणि रियाझ या टीटीपीच्या अतिशय धोकादायक दहशतवाद्यांना अमुक्रमे रावळपिंडी, लाहोर आणि रहिम यार खानमधून अटक करण्यात आली.
दहशतवाद्यांकडून ६,२३८ ग्रॅम स्फोटके, २३ डिटोनेटर, ६१ फूट सेफ्टी फ्युज वायर, ३ आयइडी आणि बंदी घातलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी लाहोर आणि अन्य शहरांमधील महत्वाच्या इमारतींवर हल्ल्यांचा कट केला होता.





