Satara | राजमाता अहिल्यादेवींच्या पुतळ्यासाठी 20 लाखांचा निधी

फलटण, (प्रतिनिधी) – पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यासाठी आणि सुशोभिकरणासाठी 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. गरजेनुसार अजूनही निधी उपलब्ध करण्यात येईल, असे आश्वासन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.
फलटण येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. र्त्यांवेळी ते बोलत होते.
फलटण पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर, सचिन पाटील,
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे नवनियुक्त संचालक माणिकराव सोनवलकर, विलासराव नलवडे, पंचायत समितीचे माजी सदस्य धंनजय साळुंखे-पाटील, संजय कापसे, रणजित भोसले, माजी नगरसेवक अजय माळवे,
सुधीर अहिवळे, भाजपचे पश्चिम मंडलाध्यक्ष अमोल सस्ते, व्यापारी संघटनेचे सूर्यकांत दोशी, आमिर शेख व धनगर समाजबांधव उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा फलटणमध्ये व्हावा, अशी धनगर समाजबांधवांची मागणी होती.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुतळा समितीस मान्यता मिळण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तुकाराम शिंदे आणि संदीप चोरमले यांनी प्रयत्न केले होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे अखंड हिंदुस्थानात ऐतिहासिक कार्य आहे. त्यांच्या कार्याला शोभेल असा पुतळा आणि परिसराच्या सुशोभिकरणासाठी 20 लाख रुपये निधी उपलब्ध केला आहे.
गरजेनुसार आणखी निधी उपलब्ध करणार असल्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले. समितीच्यावतीने वेताची काठी, घोंगडी आणि जरीचा पिवळा फेटा देऊन, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सन्मान करण्यात आला.
सरपंच शुभांगी शिंदे आणि धनश्री गावडे यांनी अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर यांची खण-नारळाने ओटी भरून सन्मान केला. समितीचे अध्यक्ष तुकाराम शिंदे, उपाध्यक्ष संदीप चोरमले, संतोष गावडे, महादेव पोकळे, बजरंग गावडे, नानासाहेब ईवरे, लक्षमणराव सोनवलकर, विजय भिसे, विष्णू सूळ, संदीप बुधनवर यांनी स्वागत केले. खजिनदार महादेव पोकळे यांनी आभार मानले.





