पुणे जिल्हा | सासवड येथे 20 जोडपे विवाहबद्ध

सासवड, (प्रतिनिधी) – येथील पुरंदर हायस्कूल येथे रविवारी (दि. 19) आदर्श क्रांती संघटनेच्या वतीने आयोजक संजय ज्ञा. जगताप व संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे यांनी 20 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न केला. या सोहळ्यात वधू-वरां पोषाख, वधूचे मंगळसूत्र, वधू-वरांचे चप्पल बूट हे सर्व संघटनेच्या वतीने दरवर्षी दिले जाते हे संघटनेचे विवाह सोहळ्याचे 18 वर्ष असल्याची माहिती जगताप यांनी दिली.
यावेळी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, विजय कोलते, सुदामराव इंगळे, शामकांत भिंताडे, बाळासाहेब जगताप, बबनराव टकले, डेक्कन बँकेचे अध्यक्ष काशिनाथ मोरे, सासवडचे माजी नगराध्यक्ष हेमंत भोंगळे, इस्माईल सय्यद, बळीराम सोनवणे, बाळासाहेब भिंताडे, बाळासाहेब कामठे, हेमंत माहूरकर, राष्ट्रवादीचे पुरंदर-हवेलीचे निवडणूक प्रमुख वामनराव जगताप, दत्ता झुरंगे, माणिकराव झेंडे पाटील, रामदास जगताप, हनुमंत पवार, बंडुकाका जगताप व रामभाऊ झेंडे यांनी सुञसंचालन केले.
सोहळ्याचे आयोजन विकास जगताप, सुनील जगताप, सचिन जगताप, भरत क्षीरसागर, गणेश महाजन, गिरीश कर्नावट, प्रशांत राऊत, उमेश लांडगे, महेंद्र जगताप, नवनाथ बोरावके, अजय सिंह जगताप, गणेश मोरे, उमेश जगताप, प्रदीप जगताप, बाळासाहेब पायगुडे, सचिन राऊत, अमोल ढोणे, विजय पुरंदरे, शांताराम सावंत, मोहन जगताप, अविराज खेनट, मुन्ना तांबोळी, अमोल ढोणे, अभिजीत बारवकर, बाळासाहेब झेंडे, निलेश मांढरे, भाऊसाहेब फडतरे, किशोर चव्हाण, बापू फुले,पप्पू जगताप, राहुल गायकवाड, प्रकाश काळे, चंद्रकांत गिरमे, प्रदीप बोरावके, केले.





