“2 नंबरी सरकारची 2 वर्ष” चित्रा वाघ यांचा भन्नाट कवितेतून आघाडी सरकारवर हल्ला

मुंबई – भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी कवितेतून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “2 नंबरी सरकारची 2 वर्ष” असे बोचरे शिर्षक देत वाघ यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पुर्ण झाली आहे. त्यापाश्वभूमीवर चित्रा वाघ यांनी कविता करत टीका केली आहे.
2 नंबरी सरकारची 2 वर्षं
देशमुखांना वसूलीची घाई
परबांची मुजोरशाहीमुश्रीफांना टेंडरची मलाई
नवाब मलिक दाऊद का ‘भाई’निलेश लंकेची गुंडाई
महेबूब शेखची झुंडशाहीसंजय राठोडांची लफंगाई
राऊतांची नुसती कोल्हेकुईमुख्यमंत्र्यांची जनतेप्रती बेपर्वाई
2 नंबरी #MVA सरकारची
ही काळी कमाई !— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 30, 2021
चित्रा वाघ यांनी आघाडी सरकारला दोन वर्ष पुर्ण झाले त्यावरून एक कविता करत सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 2 नंबरी सरकारची 2 वर्षं, देशमुखांना वसूलीची घाई, परबांची मुजोरशाही, मुश्रीफांना टेंडरची मलाई, नवाब मलिक दाऊद का ‘भाई’, निलेश लंकेची गुंडाई, महेबूब शेखची झुंडशाही, संजय राठोडांची लफंगाई, राऊतांची नुसती कोल्हेकुई, मुख्यमंत्र्यांची जनतेप्रती बेपर्वाई, 2 नंबरी #MVA सरकारची, ही काळी कमाई ! अशी काव्यात्मक टीका वाघ यांनी ट्वीट करत आघाडी सरकारवर केली आहे.
दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या तीन पक्षाचे मिळून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. या महाविकास आघाडी सरकारला 28 नोव्हेंबर रोजी दोन वर्ष पुर्ण झाले आहेत. त्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी या सरकारवर जोरदार टीका केली आहे. यामध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ आघाडीवर आहेत.





