War 2 trailer : हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या बहुप्रतिक्षित वॅार 2 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रतीक्षा संपली असून वाॅर 2 चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरचा धमाकेदार अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. ट्रेलरमध्ये हृतिक आणि ज्युनियर एनटीआर यांच्यातील जोरदार टक्कर दाखवण्यात आली आहे, ज्यामुळे हे सिद्ध होते की चित्रपटातील अॅक्शन सीन कसे असतील. तूर्तास ट्रेलरमधून तरी अॅक्शन सीन वन लेव्हल अप असल्याचे दिसत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच चाहत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. चाहत्यांकडून ट्रेलरचे कौतुक केले जात आहे. वॉर 2 च्या ट्रेलरमध्ये हृतिक आणि ज्युनियर एनटीआरसह चित्रपटातील कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे. अभिनेत्री कियारा अडवाणी पुन्हा एकदा बोल्ड अंदाजमध्ये दिसत आहे. येत्या १४ अॅागस्टला वॅार 2 रिजील होणार आहे. यामुळे प्रेक्षकांच्या मनाता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या बिग बजेट चित्रपटातून साऊथ अभिनेता ज्युनिअर एनटीआरने बॅालिवूडमध्ये दमदार एन्ट्री केली आहे. अयान मुखर्जी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.