छत्तीसगढमध्ये आणखी 2 नक्षलींचा खात्मा; चालू वर्षी आतापर्यंत छत्तीसगढमध्ये 157 नक्षली ठार
Updated On:

सुकमा –छत्तीसगढमध्ये मंगळवारी सुरक्षा दलांनी आणखी २ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ती घटना सुकमा जिल्ह्यात घडली. त्या जिल्ह्यातील जंगलव्याप्त टेकडीवर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने नक्षलींच्या शोधासाठी मोहीम राबवली. त्यावेळी आमनेसामने आल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये २ नक्षली मारले गेले.
याआधी सोमवारी छत्तीसगढच्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि नक्षलींमध्ये चकमक झाली. त्यामध्ये एका महिलेसह ३ नक्षली ठार झाले. सुरक्षा दलांकडून नक्षलींविरोधात धडक मोहिमा राबवल्या जात आहेत. त्यामुळे चालू वर्षी आतापर्यंत छत्तीसगढमध्ये १५७ नक्षली मारले गेले. त्या मोहिमा नक्षली संघटनांसाठी जोरदार हादरा ठरत आहेत. आगामी काळात नक्षलविरोधी माेहिमांची तीव्रता वाढवण्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.





