रांची – छत्तिसगढमधील नारायणपूर जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसांचा सहायक समादेशासह त्याच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला, अशी माहिती वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
अुटीबीपीच्या 45 बटालीयनच्या कडेमेटा तळअवर हा हल्ला करण्यात आला. या पोलिसांचे पथक या भागात कातवाई करत असताना हा हल्ला करण्यात आला. तळापासून सुमारे सहाशे मिटर अंतरावर माओवाद्यांच्या एका छोट्या गटाने त्यांच्यावर हल्ला चढवला. एक एके 47 रायफल, दोन बुलेटप्रूफ जॅकेट आणि एक वायरलेस सेट लुटून नेल्यानंतर त्यांनी पोबारा केला. बस्तरचे पोलीस महा निरीक्षक पी. सुंदरराज म्हणाले, तातडीने घटनास्थळावर अतिरिक्त कुमक पाठवून मृतदेह ताब्यात घेण्यात आले.
छत्तिसगढमध्ये माओवाद्याछ्या हल्ल्याच्या अशा अनेक घटना गेल्या वर्षभरात घडल्या आहेत. गेल्या महिन्यातही नारायणपूर जिल्ह्यात आयटीबीपीचा एक जवान माओवाद्यांच्या हल्ल्यता मरण पावला होता. तर एक जण जखमी झाला होता. स्थअनिक कॉंग्रेस आमदार चंदन कस्यप यांच्या दौऱ्यासाठी रस्ते खुले करणारे हे पथक होते. गेल्या महिन्यात एका उद्योगाच्या व्यवस्थापकाची हत्या करून सहा वाहने माओवाद्यांनी पेटवून दिली होती.