ताज हॉटेलमध्ये आढळल्या एकाच नंबरच्या 2 कार

मुंबई – येथील ताज हॉटेलमध्ये सकाळी 11 वाजताच्या सुमारस एकसारख्या नंबर प्लेट असलेली दोन वाहने सापडली आहेत. दोन्ही वाहने एकाच मॉडेलची असून हॉटेलच्या गेटच्या आत होती. ही वाहने संशयास्पद वाटून मुंबई पोलिसांनी वाहने ताब्यात घेतली आहेत. या वाहनांची तपासणी केल्यानंतर या गाडीचे मालक शागीर अलीच्या तक्रारीवरुन कुलाबा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळ गाडीचे मालक असलेले शागीर अली यांनी ही गाडी ताज हॉटेलच्या बाहेरच्या परिसरामधून पकडली. त्यानंतर पोलिसांना या संदर्भात माहिती देत यासंदर्भात गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. शागीर आली यांनी गेल्या सहा महिन्यांपूर्वीच डुबलीकेट नंबर प्लेटच्या संदर्भात आरटीओ कडे तक्रार दाखल केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना खोटे चालान भरावे लागत होते. या सगळ्या आर्थिक भुर्दंडाच्या संदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. परंतु आज डुपलीकेट नंबर प्लेट असलेले गाडी त्यांना सापडली आणि त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेत या सगळ्या संदर्भाची तक्रार केलेली आहे. मुंबईतील कुलाबा पोलिस स्थानकात या गाड्या आणि आरोपी फिर्यादी आणण्यात आले आहे.
आपल्या वाहनावर बनावट नंबर प्लेट वापरणाऱ्या चालकाने पोलिसांना सांगितले की, तो कर्ज फेडण्यास सक्षम नाही, म्हणून त्याने त्याच्या वाहनाचा शेवटचा क्रमांक 3 होता तो 8 करून बदलला. यातील मूळ वाहन क्रमांक MH01EE2388 या प्रकरणातील संशयित आरोपी चालकाचा कार क्रमांक MH01EE2383 असा असल्याने त्याने शेवटी 3 चे 8 मध्ये रूपांतर केले होते.





