वादाची ठिणगी ! ताज हॉटेलमध्ये मांडी घालून बसण्याच्या महिलेच्या पद्धतीवर आक्षेप; कोल्हापुरी चप्पलवरही…

Taj Hotel | मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. ज्याची सध्या चांगलीच चर्चा झाली आहे. त्याचं झालं असं की, येथे एक महिला आपल्या बहिणीसोबत जेवायला गेली होती, मात्र ही महिला जेवताना खुर्चीवर मांडी घालून बसलेली होती. त्यांच्या या पद्धतीवर आक्षेप घेत ताज हॉटेलच्या मॅनेजरने येऊन ही योग्य बसण्याची पद्धत नसल्याचे सांगितले.
इतकेच काय तर पायात कोल्हापुरी चप्पल घालण्यावरून देखील त्यांनी आक्षेप घेतला. याच घटनेवर नाराजी व्यक्त करत युअर स्टोरीच्या संस्थापक आणि सीईओ श्रद्धा शर्मा यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. त्यांनी आपल्या या व्हिडीओत ताज हॉटेलच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण ?
श्रद्धा शर्मा ताज हॉटेलमधील हासऊ ऑफ मिंग या विभागात जेवायला गेल्या होत्या. दिवाळीनिमित्त त्यांच्यासोबत त्यांची बहीणही होती. यावेळी जेवणाच्या टेबलवर त्यांना जेवण देण्यात आले होते. यावेळी श्रद्धा जेवताना खुर्चीवर मांडी घालून बसल्या होत्या. याच बसण्याच्या पद्धतीवर ताज हॉटेलच्या मॅनेजरने आक्षेप नोंदवला. यावर श्रद्धा शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एक आम इंसान, जो मेहनत करके, अपना पैसा कमा कर, अपनी इज़्ज़त के साथ ताज होटल में आता है — उसे आज भी इस देश में ज़लील और अपमानित होना पड़ता है।
और मेरी गलती क्या है? सिर्फ़ ये कि मैं बैठ गई एक “regular padmasana style” में?
क्या ये मेरी गलती है कि ताज मुझे सिखा रहा है कि कैसे बैठना… pic.twitter.com/vKBYjg8ltb— Shradha Sharma (@SharmaShradha) October 21, 2025
व्हीडिओत काय म्हणाल्या ?
शर्मा यांनी ताज हॉटेलमध्येच बसून हा व्हिडीओ शूट केला आहे. यात त्या म्हणतात की, मी मेहनतीनं पैसे कमवते आणि यंदा दिवाळीसाठी मी फार काहीच केलं नसल्यानं म्हटलं, चला जेवणासाठी इथं येऊया. पण मॅनेजर आमच्याकडे आला आणि त्यांनी म्हटलं की तिथं असणाऱ्या एका दुसऱ्या गेस्टनं बसण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला, कारण मी पाय दुमडून बसले होते. Taj Hotel |
मॅनेजर म्हणाले की, ‘ही एक फाईन जाईनची जागा आहे, जिथं उच्चभ्रू माणसं येतात. त्यामुळं तुम्ही व्यवस्थित बसलं पाहिजे, पायात शूज घालून.’ आपण पायात कोल्हापूरी चप्पल घातलेली होती, तिथं मॅनेजरनं येऊन असं हटकणं आणि कोणा दुसऱ्या व्यक्तीनं हरकत घेतली म्हणून व्यवस्थित बसण्यास सांगणं हे चुकीच आहे, असंही त्या म्हणाल्या.
माझी चुक काय आहे?
आज एक साधारण व्यक्ती कष्टाने पैसे कमवतो आणि ताज हॉटेलमध्ये जेवायला येतो. मात्र तरीदेखील सामान्य माणसाला ताज हॉटेलमध्ये अपमानित केले जाते. माझी चुक काय आहे? मी मांडी घालून जेवायला बसले ही माझी चुक आहे का? असा सवाल त्यांनी या व्हिडीओमध्ये विचारला आहे.
हे ठिकाण श्रीमंती, दर्जा आणि समाजातील स्थान यांचं प्रतीक आहे असं मॅनेजरनं सांगितलं. पण, मेहनतीनं पैसे कमवून मी इथं आले तर त्यात गैर काय? मी कोणाला त्रास दिलाय? असं म्हणत आपण तिथं अतिशय सहज आणि तितकंच सावरून बसलेलो पण, घडला प्रकार मात्र अतिशय विचलित करणारा होता, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, शर्मा यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. Taj Hotel |
हेही वाचा :
ठरलं तर ! इंडिया अलायन्सकडून तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ; होणार लवकरच घोषणा





