Baramati Bypoll 2026 : बारामती विधानसभा पोटनिवडणूक रंगतदार होण्याची शक्यता दिसत आहे. अजित पवार यांच्या निधानानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी 23 एप्रिल या दिवशी मतदान तर 4 मे या दिवशी निकाल लागणार आहे. तसेच 6 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे हालचालींना वेग आला आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच सुनेत्रा पवार यांच्या विरोधात 19 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सध्याच्या घडीला सुनेत्रा पवार यांचे पारडं जड असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीची पोटनिवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केल्याने निवडणुकतील रंगत वाढणार आहे. 16 अपक्ष उमेदवार असून तीन उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. 6 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटचा तारीख असल्याने आणखी उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. याशिवाय काँग्रेसकडून काही इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असून, त्यांचाही उमेदवार रिंगणात उतरला जाऊ शकतो. त्यामुळे काँग्रेसकडून कोणाच्या नावाची घोषणा केली जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. मन मोठं करून सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांच्या आवाहनाला कसा प्रतिसाद राजकीय पक्ष देणार याकडे लक्ष असणार आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 19 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्या उमेदवारांची नावे सतिश कदम ( हिंदुस्तान जनता पार्टी ) सागर भिसे ( अपक्ष ) सागर भिसे ( अपक्ष ) राघू घटुकडे ( न्यू राष्ट्रीय समाज पार्टी ) गजानन गवळी ( अपक्ष ) त्रिशाला कांबळे ( अपक्ष ) दिलीप अळोणी ( अपक्ष ) दत्तात्रेय बेदरे ( अपक्ष ) अरूण निटुरे ( राष्ट्रीय किसान बहूजन पार्टी ) मिथून आटोळे ( अपक्ष, बारामती ) रजाक मुलाणी ( अपक्ष ) संदीप खरात ( अपक्ष ) विलास होळकर ( अपक्ष, बारामती ) अभिजीत बिचुकले ( अपक्ष ) अभिजीत बिचुकले ( अपक्ष ) अनिल तुपे ( अपक्ष ) संकेत गावडे ( अपक्ष, बारामती ) दादा थोरात ( अपक्ष, बारामती ) अभिजीत कांबळे ( अपक्ष, बारामती ) हेही वाचा : Pune Metro : मेट्रो विस्तारासाठी ‘इतक्या’ झाडांची होणार कत्तल; धक्कादायक आकडा समोर