18 हजार कोटींची गुंतवणूक होणारा आणखी एक उद्योग गुजरातकडे; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

Vijay Wadettiwar | राज्यातील अनेक उद्योग गुजरातकडे गेल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. यातच आता आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्पाअंतर्गत 18 हजार कोटींची गुंतवणूक होणार होती.
परंतु राजकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. याबाबत ट्वीट करत वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आणि आता सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये गेला असल्याचे वडेट्टीवारांनी म्हंटले आहे. Vijay Wadettiwar |
विजय वडेट्टीवार यांचे ट्वीट –
“महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. या प्रकल्पा अंतर्गत 18 हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती पुढे आली आहे. वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आणि आता सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे,” असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे. Vijay Wadettiwar |
महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे!
महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. या प्रकल्पा अंतर्गत 18 हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 19, 2024
पुढे त्यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. “हिंदू – मुस्लिम, जीभ कापा- जीभेला चटके द्या, पक्ष फोडा- आमदार पळवा… सतत असे निरर्थक उद्योग करणारे महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे. अधिकारी मंत्र्यांना खुश करण्यात व्यस्त आहे. मंत्र्यांची मस्ती, आमदारांचे नको ते लाड यामुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे आणि राज्यातील तरुणांचे रोजगार हिरावले जात आहेत,” असे वडेट्टीवार यांनी ट्वीटद्वारे म्हंटले आहे.
विरोधकांची राज्य सरकारवर टीका
राज्यातून वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेले. त्यानंतर हिरे उद्योगही गुजरातला गेल्यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती. बॉलीवूडमधला सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा फिल्मफेअर सोहळा गुजरातमध्ये करण्यात आला. यावरुन विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. यातच आता वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे गेल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा:
प्रतिक्षा संपली! ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर





