प्रतिक्षा संपली! ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

The Sabatmati Report | बॉलिवूड अभिनेता विक्रांत मॅसीच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. साबरमती एक्स्प्रेसच्या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. टीझरमध्ये 27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या घटनेची झलक दाखवण्यात आली आहे. त्यानंतर आता निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट 15 नोव्हेंबर 2024ला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. साबरमती एक्स्प्रेस दुर्घटनेबाबत 22 वर्षांपासून दडलेली माहिती या चित्रपटातून समोर येणार आहे. आता प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्याने उत्सुकता आणखी वाढली आहे. The Sabatmati Report |
View this post on Instagram
‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात अभिनेता विक्रांत मॅसी न्यूज अँकर समर कुमारच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट आधी 2 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, आचारसंहितेमुळे चित्रपटाच्या टीमला अडचणी येऊ शकतात, त्यामुळे त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा चित्रपट ३ मे रोजी प्रदर्शित होणार होता. आता पुन्हा एकदा चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे. The Sabatmati Report |
बालाजी मोशन पिक्चर्स आणि विकीर फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत, ‘द साबरमती रिपोर्ट’ मध्ये विक्रांत मॅसी, राशी खन्ना आणि रिद्धी डोग्रा मुख्य भूमिकेत आहेत. धीरज सरना दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती शोभा कपूर, एकता आर कपूर, अमूल व्ही मोहन आणि अंशुल मोहन यांनी केली आहे.
हेही वाचा:
‘मी लॉरेन्स बिश्नोईला पाठवू का ?’ सलमान खानच्या वडिलांना महिलेने दिली,’धमकी’





