17 वर्षीय मुलाच्या कमरेला पिस्तूल; पोलिसांनी घेतले ताब्यात
Updated On:

वाघोली : लोणीकंद येथील १७ वर्षीय मुलाला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा मुलगा कात्रज येथे मित्राला भेटायला जाताना कंबरेला पिस्तूल बांधून जात होता. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पिस्तुल जप्त केले आहे.
कात्रज स्मशानभूमीजवळ एक जण पिस्तूल घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली होती. त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान, त्याने खुलासा केला की तो लोणीकंद येथे राहतो आणि त्याच्या वडिलांना भाजी विक्रीच्या व्यवसायात मदत करतो. कात्रज येथे मित्राला भेटण्यासाठी आलो असल्याचे देखील त्याने स्पष्ट केले.





