न्यूझीलंड आणि भारत ( NZ vs IND ) यांच्यातील मालिकेचा पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना आज पावसामुळे रद्द झाला. वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर सुरु झालेल्या पावसाने थांबायचे नावच घेतले नाही. परिणामी सामना रद्द करण्याची वेळ ओढवली. मात्र यादरम्यान स्टेडियममधील खुर्च्यांच्या साफसफाईबाबत एक अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. न्यूझीलंडकडून 74 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला आणि सध्याचा समालोचक सायमन डौलने ट्विट करून स्काय स्टेडियमची दुर्दशेबद्दल संताप व्यक्त केलाय. सायमन डौलने स्वतः मैदानातील खुर्च्या साफ केल्या असल्याचेही म्हटले आहे.
“मला तुझा शर्ट मिळेल का”, चिमुकल्या चाहत्याच्या मागणीला वॉर्नरचा खास संदेश
न्यूझीलंड आणि भारत ( NZ vs IND ) यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला आंतरराष्ट्रीय सामना पावसामुळे उशिरा सुरू होणे अपेक्षित होते. मात्र पावसाची सततधार सुरु राहिल्याने सामना रद्द करण्यात आला. यादरम्यान, अनुभवी समालोचक सायमन डौल यांनी एक संतापजनक ट्विट केले आहे. “स्काय स्टेडियमवर खेळण्याचे आणखी एक चांगले कारण आहे (टीका करताना). मी समालोचन भागातील सर्व खुर्च्यांची साफसफाई केली आहे. जेणेकरून आमचे परदेशी पाहुणे खुर्च्यांवर बसू शकतील. किती दयनीय जागा आहे. हा लज्जास्पद प्रकार आहे.”
🚨 UPDATE from Wellington 🚨
Both captains shake hands as the first #NZvIND T20I is called off due to persistent rain.#TeamIndia pic.twitter.com/MxqEvzw3OD
— BCCI (@BCCI) November 18, 2022
@Sportsfreakconz @martindevlinnz Another great reason to play here at @skystadium . I have just cleaned all the seats in our commentary area so our overseas guests can sit down. What a shambles of a place. Embarrassing. #welcometoNZ pic.twitter.com/Xnpz5BihcI
— Simon Doull (@Sdoull) November 18, 2022
सायमन डौलने हे ट्विट करत न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड आणि स्टेडियमच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. टी-20 विश्वचषक 2022 चा हंगाम नुकताच संपला आहे. या स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्यात भारत आणि न्यूझीलंड संघांना अनुक्रमे इंग्लंड आणि पाकिस्तानने पराभूत केले होते. यानंतर आता ( NZ vs IND ) दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका आयोजित केली गेली आहे. टी-20 सामन्यांनंतर एकदिवसीय मालिकेतील सामनेही खेळवले जाणार आहेत. आजचा सामना रद्द झाल्यानंतर आता दुसरा टी-20 सामना 20 नोव्हेंबर रोजी माउंट मौनगानुई येथे तर तिसरा सामना 22 नोव्हेंबर रोजी नेपियर येथे खेळवला जाईल.