Pune District : मोफत नेत्र तपासणी शिबिराचा 167 रुग्णांनी घेतला लाभ

नारायणगाव : डिसेंट फाउंडेशन, ग्रामपंचायत वारूळवाडी आणि आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने वारुळवाडी (ता. जुन्नर) येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा 167 रुग्णांनी लाभ घेतला असून 76 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी शंकर आय हॉस्पिटल येथे नेण्यात आले.
यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई, सरपंच राजेंद्र मेहेर, ग्रामपंचायत सदस्य विनायक भुजबळ, प्रकाश भालेकर, ज्योती संते, स्नेहल कांकरिया, ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे, तालुका अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉ. एफ. बी.आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, शंकर आय हॉस्पिटल (पनवेलचे) डॉ. प्रकाश पाटील, रामभाऊ सातपुते, ग्रामोन्नती मंडळाचे संचालक अरविंद मेहर, रॉयल कॅडमीचे धनेश वारुळे उपस्थित होते.
सरपंच राजेंद्र मेहेर, सदस्य विनायक भुजबळ, ज्योती संते, तालुका आरोग्य अधिकारी वर्षा गुंजाळ रुग्णांना मार्गदर्शन केले. तर शंकर आय हॉस्पिटलचे डॉ. प्रकाश पाटील यांनी रुग्णांना उपचाराबद्दल माहिती दिली.
डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांना महात्मा फुले समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत वारुळवाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना धनेश वारुळे तर रामभाऊ सातपुते यांनी आभार मानले.





