वाल्हे -वाल्हे (ता. पुरंदर) येथे लसीकरणाच्या दुसऱ्या डोसला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारी (दि. 15), सोमवारी (दि. 16), मंगळवारी (दि. 17) तीन दिवसांत 1629 नागरिकांचे लसीकरण्यात आले.
भारतीय जैन संघटनेच्या वतीने वाल्हेसह, आडाचीवाडी, मांडकी येथे देखील करोना प्रतिबंधित लसीकरणाच्या दुसऱ्या डोसची सुरुवात करण्यात आली होती. स्वातंत्र्य दिन, सार्वजनिक सुट्टी असताना देखील, आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा सेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका,
जैन संघटनेचे पदाधिकारी व स्वयंसेवक आदींनी लसीकरण मोहीम यशश्वीपणे राबविण्यासाठी परिश्रम घेतले. रविवारी (दि.15) महर्षी वाल्मिकी विद्यालय 913, आडाचीवाडी येथे 185 असे 1098, सोमवारी (दि. 16) लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी महर्षी वाल्मिकी विद्यालयात 444 तर मंगळवारी (दि.17) प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्हे येथे 87 नागरिकांना कोवॅक्सिन लसीकरणाचा दुसरा डोस घेतला.
यावेळी, जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार, सरपंच अमोल खवले, महादेव चव्हाण, उपसरपंच चंद्रशेखर दुर्गाडे, सूर्यकांत भुजबळ, ग्रामविकास अधिकारी बबनराव चखाले, आडाचीवाडीचे सरपंच दत्तात्रय पवार, संत्यवान सूर्यवंशी, संदेश पवार, किरण कुमठेकर, हनुमंत पवार, अमोल भुजबळ, अतीष जगताप, किरण कुमठेकर, दादाराजे म्हत्रे, संदीप दाते आदी उपस्थित होते.
लसीकरण मोहिमेस तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत आंधळे, डॉ. आदित्य धारूडकर, पर्यवेक्षक राजेंद्र दळवी, औषधनिर्माण अधिकारी शकील तांबोळी,
आरोग्य सहाय्यक तानाजी मेटकरी, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.