Pune : विशेष रेल्वे गाड्यांच्या १६ फेऱ्या वाढविल्या

पुणे : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्यरेल्वेकडून साईनगर शिर्डी-बिकानेर, हडपसर-हिसार, दौंड-अजमेर आणि सोलापूर-अजमेर या विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत एकूण १६ फेऱ्या वाढविण्यात आल्याची माहिती पुणे रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
साईनगर शिर्डी-बिकानेर-साईनगर शिर्डी विशेष गाडीच्या चार फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. गाडी क्र. 04716 शिर्डी-बिकानेर ही दि. २२ आणि २९ डिसेंबरला धावेल. तर गाडी क्र. 04715 बिकानेर-शिर्डी ही दि. २१ आणि २८ डिसेंबरला धावेल. हडपसर हिस्सार-हडपसर विशेष गाडीच्या चार फेऱ्या वाढविण्यात आल्या असून, गाडी क्र. 04724 हडपसर-हिसार ही दि. २३ आणि ३० डिसेंबरला धावेल. तर गाडी क्र. 04723 हिसार-हडपसर ही दि. २२ आणि २९ डिसेंबरला धावेल.
दौंड-अजमेर-दौंड साप्ताहिक विशेष गाडीच्या चार फेऱ्या होणार असून गाडी क्र. 09626 दौंड-अजमेर ही दि. २० आणि २७ डिसेंबरला धावेल. तर गाडी क्र. 09625 अजमेर-दौंड ही दि. १९ आणि २६ डिसेंबरला धावेल. सोलापूर-अजमेर-सोलापूर साप्ताहिक विशेष गाडीच्याही चार फेऱ्या वाढविल्या असून, गाडी क्र. 09628 सोलापूर-अजमेर ही दि. १९ आणि २६ डिसेंबरला धावेल.
तर गाडी क्र. 09627 अजमेर-सोलापूर ही दि. १८ आणि २५ डिसेंबरला धावणार आहे. दरम्यान, या गाड्यांच्या थांब्यांमध्ये कोणताही बदल नाही, असे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रामपाल बड़पग्गा यांनी सांगितले.




