Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील थरकाप उडवणारे 15 व्हिडीओ समोर; एवढ्या क्रूरपणे संपवलं

Updated On:
Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील थरकाप उडवणारे 15 व्हिडीओ समोर; एवढ्या क्रूरपणे संपवलं

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख अपहरण करून हत्या केल्याची कबुली आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे व महेश केदार यांनी दिली आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी हत्या कशा पद्धतीने केली याची देखील माहिती दिली आहे. अशातच आता देशमुख हत्याप्रकरणी अंगाचा थरकाप उडवणारी माहिती समोर आली आहे.

आरोपी महेश केदारने स्वतःच्या मोबाईलमध्ये देशमुखांना मारहाण करताना तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो घेतले होते. हे सर्व 15 व्हिडिओ आणि 8 फोटो दोषारोपपत्रात जोडण्यात आले होते. हा सर्व डेटा पोलिसांच्या हाती लागला असून तो न्यायालयासमोर सादर करण्यात आला आहे. (Santosh Deshmukh Case)

2 तास 7 मिनिटे आरोपी देशमुखांना मारत होते

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी महेश केदारने स्वतःच्या मोबाईल मध्ये देशमुख यांना मारहाण करताना तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो घेतले होते. 3 वाजून 46 मिनिटांनी मारहाणला सुरुवात झाल्याचा पाहिला व्हिडीओ आहे. तर शेवटचा व्हिडिओ 5 वाजून 53 मिनिटांचा आहे. ज्यामध्ये संतोष देशमुख यांचा विव्वळताना एकदम लहान आवाज येत आहे. तब्बल दोन तास सात मिनिटे आरोपी संतोष देशमुख यांना मारत होते आणि व्हिडीओही काढत होते. हे सर्व व्हिडीओ नऊ डिसेंबर रोजीचे आहेत. पाहुयात संतोष देशमुखांना क्रूरपणे संपवल्याचा घटनाक्रम.

थरकाप उडवणारे 15 व्हिडीओमध्ये नेमकं काय?

व्हिडीओ 1: 9 डिसेंबर 2024 रोजी 3 वाजून 46 मिनिटांनी मारहाणीला सुरुवात केली आहे. मोबाईलमधला हा पहिला व्हिडीओ एक मिनिट दहा सेकंदांचा आहे. यामध्ये आरोपी संतोष देशमुख यांना पाईप आणि वायरप्रमाणे असलेल्या हत्याराने, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत.

व्हिडीओ 2 : 9 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3.47 वाजता 53 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये देशमुखांना आरोपी शिवीगाळ करून पाईप आणि वायरने मारहाण करत आहेत. आरोपी देशमुख यांची पॅंट काढत आहेत.

व्हिडीओ 3 : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.38 वाजता 35 सेकंद देशमुखांना मारहाण सुरू असताना दुसरा आरोपी वायरसारखे हत्यार घेऊन पाठीमागे लावलेल्या मुठीने मारहाण करत आहे.

व्हिडीओ 4: 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.51 वाजता दोन मिनिट चार सेकंद आरोपी शिवीगाळ करून पाईपने मारहाण करताना व्हिडिओ काढत आहेत. व्हिडिओ शूटिंग काढणारा महेश केदार असल्याचं दिसत आहे. याच व्हिडीओमध्ये सुदर्शन घुलेची गाडीही दिसत आहे.

व्हिडीओ 5: 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.52 वाजता 7 सेकंद या व्हिडीओमध्ये आरोपी संतोष देशमुखांना कॉलर धरून उठवून बसवत आहेत.

व्हिडीओ 6 : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.53 वाजता ३६ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये देशमुख यांना तोंडावर, शरीरावर मारहाण झालेली दिसत आहे.

व्हिडीओ 7 : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.54 वाजता 14 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये देशमुखांना पाईपने मारहाण करताना मोबाईलमध्ये शूट करताना एक व्यक्तीचा हात दिसतो.

व्हिडीओ 8 : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.54 वाजता 4 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये आरोपी संतोष देशमुखांना बळजबरीने काही तरी विचारताना दिसत आहेत.

व्हिडीओ 9: 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.55 वाजता 52 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये देशमुख यांना तोंडावर, तसेच इतर ठिकाणी मारहाण झालेली आहे. तसेच, सुदर्शन घुले सगळ्यांचा बाप आहे, असं जबरदस्ती म्हणायला लावलं जातं.

व्हिडीओ 10 : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.58 वाजता दोन सेकंद देशमुखांना अंगावरील सर्व कपडे काढून अंडरवेअरवर बसवून पाईपने मारहाण केली व दुसरी व्यक्ती व्हिडिओ शूटिंग करत आहे.

व्हिडीओ 11 : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.58 वाजता 5 सेकंद जखमी देशमुखांना अंडरवेअरवर बसवून दुसरी व्यक्ती व्हिडिओ शूटिंग करत होता.

व्हिडीओ 12 : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.59 वाजता 12 सेकंद देशमुखांना जबरदस्तीने केस ओढून बोलायला लावून व्हिडिओ शूटिंग केलं जातं.

व्हिडीओ 13: 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ सायंकाळी 5.34 वाजता 1.44 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये देशमुखांना स्कॉर्पिओ गाडीजवळ अंडरवेअरवर झोपवल्याचे दिसते, आरोपी हे देशमुखांना रक्ताचे डाग असलेली पँट घालताना दिसतात.

व्हिडीओ 14: 9 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.35 वाजता 1.04 सेकंद देशमुखांना उठवून बसवून शर्ट घालताना दिसत आहे. शर्ट घालण्याअगोदर फाटलेले व रक्ताने भरलेले बनियन फेकून देताना दिसत आहे.

व्हिडीओ 15 : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ सायंकाळी 5.53 वाजता 24 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कण्हत असताना आवाज येतो.

आणखी संबंधित बातम्या

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी 14 महिन्यानंतर येणार जेलबाहेर; कारण काय?

2026-03-08 11:18:02

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी 14 महिन्यानंतर येणार जेलबाहेर; कारण काय?

Walmik Karad : वाल्मिक कराडचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

2026-02-27 16:48:59

Walmik Karad : वाल्मिक कराडचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

Walmik Karad : कृष्णा आंधळे अद्यापही फरार, वाल्मिक कराडच्या जामीन अर्जाबाबत कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश

2026-02-26 13:31:05

Walmik Karad : कृष्णा आंधळे अद्यापही फरार, वाल्मिक कराडच्या जामीन अर्जाबाबत कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश

Dnyaneshwari Munde : वाल्मिक कराडच्या मुलांपासून कुटुंबाला धोका; ज्ञानेश्वरी मुंडेंची पोलीस संरक्षणाची मागणी

2026-02-21 23:33:02

Dnyaneshwari Munde : वाल्मिक कराडच्या मुलांपासून कुटुंबाला धोका; ज्ञानेश्वरी मुंडेंची पोलीस संरक्षणाची मागणी

Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर

2026-02-21 15:44:40

Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर