Asia Cup 2025 : १५ मुस्लिम, ३ हिंदू, भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंचा मिळून बनवला धडाकेबाज संघ, आशिया कपमध्ये घालणार धुमाकूळ

Hong Kong Announce Asia Cup 2025 squad : आशिया कप 2025 ची सर्व क्रिकेट चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी सर्व देशांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. अलीकडेच हाँगकाँगने आपला संघ जाहीर केला असून, हा संघ पाचव्यांदा आशिया कपमध्ये सहभागी होण्यास सज्ज आहे. विशेष म्हणजे, या संघातील बहुतांश खेळाडू भारत आणि पाकिस्तानात जन्मलेले आहेत.
हाँगकाँगचा 20 खेळाडूंचा संघ जाहीर –
हाँगकाँगने 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप 2025 साठी आपला 20 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. यासिम मुर्तझा याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर बाबर हयात उपकर्णधार असेल. हे दोन्ही खेळाडू पाकिस्तानात जन्मलेले आहेत. यासिम मुर्तझा प्रथमच मोठ्या स्पर्धेत कर्णधार म्हणून खेळणार आहे. हाँगकाँगने एसीसी प्रीमियर कप 2024 मध्ये नेपाळचा पराभव करून आशिया कपमध्ये स्थान मिळवले होते.
पाचवा आशिया कप, मोठ्या अपेक्षा –
हाँगकाँगने यापूर्वी 2004, 2008, 2018 आणि 2022 मध्ये आशिया कपमध्ये भाग घेतला आहे. यावेळी संघाचे उद्दिष्ट उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आहे. अंशुमन रथ, नियाझाकत खान मोहम्मद, बाबर हयात, एजाज आणि एहसान खान यांसारख्या अनुभवी खेळाडूंवर संघाच्या आशा अवलंबून आहेत. विशेष बाब म्हणजे, या सर्व खेळाडूंचा जन्म हाँगकाँगमध्ये झालेला नाही. हा 20 खेळाडूंचा संघ सध्या प्रशिक्षण संघ आहे. आशिया कपसाठी प्रत्येक संघ फक्त 17 खेळाडू निवडू शकतो, त्यामुळे यातील काही खेळाडूंना वगळले जाऊ शकते.
भारत-पाकिस्तानात जन्मलेले खेळाडू –
संघातील झिशान अली, शाहिद वासिफ आणि नियाझाकत खान मोहम्मद यांचा जन्म पाकिस्तानात, तर किंचित शाह, अंशुमन रथ आणि आयुष आशीष शुक्ला यांचा जन्म भारतात झाला आहे. हाँगकाँग आपल्या आशिया कप मोहिमेची सुरुवात 9 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध करणार आहे.
हाँगकाँगचा आशिया कप संघ:
यासिम मुर्तझा (कर्णधार), बाबर हयात (उपकर्णधार), झिशान अली (यष्टीरक्षक), शाहिद वासिफ (यष्टीरक्षक), नियाझाकत खान मोहम्मद, नसरुल्ला राणा, मार्टिन कोएत्जी, अंशुमन रथ, एहसान खान, कल्हन मार्क, आयुष आशीष शुक्ला, मोहम्मद एजाज खान, अतीक उल रहमान इकबाल, किंचित शाह, आदिल महमूद, अनास खान, हारून मोहम्मद अरशद, अली-हसन, गझनफर मोहम्मद, मोहम्मद वाहीद.





