Pune District : अभिनव चेतना पतसंस्थेकडून १५ टक्के लाभांश
Pune District : पारदर्शक कारभार, कर्जवसुलीला सभासदांनी केलेले सहकार्य व सभासदांचा संचालक मंडळावर असलेला विश्वास यामुळे यावर्षीही सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष हेमंत हाडके यानी दिली.

लोणी काळभोर : अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै सोपानराव हाडके यांनी दाखवलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे संस्थेचे कामकाज चालू आहे. पारदर्शक कारभार, कर्जवसुलीला सभासदांनी केलेले सहकार्य व सभासदांचा संचालक मंडळावर असलेला विश्वास यामुळे यावर्षीही सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष हेमंत हाडके यानी दिली.
अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्थेची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष हेमंत हाडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पतसंस्थेचे संचालक मुकुंद काळभोर, सचिन काळभोर, अशोक भोसले, विठ्ठल लांडगे, कृष्णा पवार, जयेश हाडके, शामराव शेवाळे, स्वाती हाडके, प्राजक्ता भोसले, कर्मचारी धनराज बनसोडे, विजय जाधव, अर्चना विद्वान्स, कानिफनाथ गणगे व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक कै. सोपानराव हाडके, संचालक कै. बाळासाहेब काळभोर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. अहवालाचे वाचन करण्यात आले. या प्रसंगी सभासदांच्या गुणवंत मुलांना गौरवचिन्ह व रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. संचालक रमेश भोसले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संचालक ज्ञानेश्वर कुंभार म्हणाले, पतसंस्थेचे कामकाज अत्यंत प्रामाणिकपणे व चिकाटीने सुरू असून संस्थेचा आर्थिक पाया भक्कम आहे. संचालक पांडुरंग काळभोर यांनी पतसंस्थेच्या हितरक्षणासाठी थकबाकीदारांना आवाहन केले. संस्थेची नाहक बदनामी न करता, कायदेशीर वसुलीची कठोर कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी आपली थकीत कर्जाची रक्कम मुदतीत भरावी, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन व्यवस्थापिका प्रतिभा तुपे यांनी केले.
ठेव सुरक्षेसाठी संचालकांची जबाबदारी
संस्थेचे उपाध्यक्ष सचिन काळभोर म्हणाले, पतसंस्थेतील प्रत्येक सभासदाची ठेव सुरक्षित ठेवणे ही सर्व संचालक मंडळाची मुख्य जबाबदारी आहे. सभासदांनी संस्थेवर दाखवलेला विश्वास हीच आमची खरी ताकद आहे.





