खळबळजनक! उधारीचे पैसे परत मागणाऱ्या १४ मित्रांना एक-एक करून संपवलं…

बँकॉक – मैत्री हे असे नाते असते, ज्यामध्ये लोक सर्वस्वाचा त्याग करायला तयार असतात. पण जर मित्रच जीवाचा शत्रू बनला, तर परिस्थिती बिकट होते. अशीच एक धक्कादायक घटना थायलंडमधून समोर आली आहे, जिथे एका 36 वर्षीय महिलेने आपल्याच 14 मित्रांची हत्या केली आहे.
या महिलेच्या व्यसनाने तिच्यावर एवढा जबरदस्त परिणाम केला की स्वतःला या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी ती आपल्याच मित्रांची शत्रू आणि खुनी बनली. ही महिला सिरीयल किलर का झाली, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
‘मिस सायनाइड’
सारारत रंगसिवुथापोर्न असे या थायलंडमधील महिलेचे नाव आहे, जिला ‘मिस सायनाइड’ असे टोपणनाव देण्यात आले आहे. तिच्यावर 14 मित्रांचा छळ करून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. तिला एका मित्राच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
जर सारारत रंगसिवुथापोर्न इतर सर्व बाबतीत दोषी आढळली, तर ती थायलंडच्या इतिहासातील सर्वात कुप्रसिद्ध सिरीयल किलर बनेल.
हत्या करण्यामागील कारणे
थायलंडच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारारत रंगसिवुथापोर्नला जुगाराचे प्रचंड व्यसन होते. तिचा या व्यसनासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होत असे. क्रेडिट कार्डवर प्रचंड कर्ज असतानाही ती मित्र-परिचितांकडून पैसे उधार घ्यायची. मात्र, हेच लोक तिच्याकडे पैसे मागायला लागल्यावर तिने त्यांना धमकावून मारहाण करण्यास सुरुवात केली.
पैसे परत मागू नयेत म्हणून तिने आपल्या 14 मित्रांच्या जेवणात सायनाइड टाकून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे.
रहस्य उघड कसे झाले?
या सिरीयल किलर महिलेचे रहस्य एप्रिल 2023 मध्ये उघड झाले. सारारत रंगसिवुथापोर्न आपल्या सिरीपोर्न खानवांग नावाच्या मित्रासोबत रत्चाबुरी प्रांतात गेली होती. दोघेही नदीच्या काठावर मासे खात होते. सिरीपोर्नने एक दाणा तोंडात टाकताच त्याला त्रास होऊ लागला आणि त्याचा मृत्यू झाला.
पोस्टमार्टम अहवालात सिरीपोर्नने खाल्लेल्या धान्यात सायनाइड असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली. मृताच्या कुटुंबीयांनी सारारत रंगसिवुथापोर्नविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
14 हत्यांचा तपशील
या घटनेनंतर मारले गेलेल्या इतर मित्रांच्या कुटुंबीयांनीही पुढे येत सारारत रंगसिवुथापोर्नवर गुन्हा दाखल केला. 2015 पासून आतापर्यंत सारारत रंगसिवुथापोर्नवर 14 जणांच्या हत्येचे गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलिसांचे म्हणणे आहे की, प्रत्येक हत्येत एक साम्य होते – सगळ्यांना सायनाइड देऊन मारण्यात आले. त्यामुळेच थायलंडच्या जनतेने सारारत रंगसिवुथापोर्नला ‘मिस सायनाइड’ असे नाव दिले आहे.





