Pune Curfew : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी; नेमके काय असणार निर्बंध? जाणून घ्या…
Pune Curfew: यानुसार, मोर्चे, मिरवणुका, सभा बंद करता येतात. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी लोकांच्या जमावावर निर्बंध घातले जातात हा आदेश 26 मे रोजी रात्री 1 वाजल्यापासून 8 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत लागू असेल असं सांगण्यात आलं आहे.

Pune curfew : पुणे शहरात उद्या (मंगळवारी) रात्रीपासून पुढील १४ दिवसांसाठी ‘जमावबंदीचे आदेश’ लागू करण्यात आले आहेत. या काळात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने आणि सभा घेण्यास प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे.
सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करण्यात आला आहे. सार्वजनिक शांतता आणि कायदा सुव्यवस्था राख्याच्या दृष्टीने सर्वात जास्त वापरले जाणारे हे उपकलम आहे. त्यानुसारच जमावबंदीचे हा आदेश लागू केला आहे.
यानुसार, मोर्चे, मिरवणुका, सभा बंद करता येतात. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी लोकांच्या जमावावर निर्बंध घातले जातात हा आदेश 26 मे रोजी रात्री 1 वाजल्यापासून 8 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत लागू असेल असं सांगण्यात आलं आहे.
सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कृतीवर बंदी
या आदेशानुसार नुसार शस्त्रे बाळगणे दगड, स्फोटके, लाठ्या ठेवणे, भडकाऊ घोषणा, गाणी, भाषणे, सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कृती यावर बंदी लागू करता येते. जर एखाद्या व्यक्तीने वरील बंदीचे उल्लंघन करून शस्त्र किंवा धोकादायक वस्तू बाळगल्या तर, पोलीस त्या वस्तू जप्त करू शकतात संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते.
कारवाईचा इशारा
जर एखाद्या व्यक्तीने वर नमूद केलेल्या बंद घातलेल्या गोष्टींसंदर्भातील आदेशांचं उल्लंघन करून शस्त्र किंवा धोकादायक वस्तू बाळगल्या तर पोलीस त्या वस्तू जप्त करू शकतात आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे.
कोणत्या गोष्टी करता येणार नाहीत?
- कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर नेणे.
- दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.
- कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे, पुढा-यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.
- शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे.
- शिष्टाचाराच्या विरोधात असणारे चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही वस्तू वापरणे किंवा वस्तू तयार करणे, अशा वस्तूंचे प्रदर्शन करणे किंवा प्रसारित करण्यावर बंदी आहे.
- मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे, सार्वजनीक टिका करणे, उच्चार गाणी गाणे, वाद्य वाजविणे.
- सार्वजनिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथून टाकण्यास कारणीभूत ठरू शकेल अशा सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे.
सध्या देशात आणि राज्यात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे आणि इंधन तुटवड्यामुळे सर्वसामान्य जनतेत तीव्र असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलने, निदर्शने आणि मोर्चे काढले जात आहेत. यामुळे शहरातील शांतता धोक्यात येऊ नये आणि वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्याचे म्हंटले जात आहे.
हेही वाचा:
Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात स्कॉर्पियो कोसळली! मृत 8 जणांची नावे समोर






