Sanjay Gaikwad : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड प्रबोधनकार ठाकरे यांच्या दगलबाज शिवाजी आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकावरील बंदीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदेंनी अशा वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अशीही मागणी यावेळी दानवे यांनी केली आहे. अंबादास दानवे म्हणाले की, “दगलबाज शिवाजी, शिवाजी कोण होता? या पुस्तकावर बंदी घालण्यासाठी अधिवेशनात मागणी करणा असल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटले. मला असं वाटतं संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, आतमध्ये काय आहे त्याला माहीतच नसतं. मला असं वाटतं किमान त्याने प्रस्तावना तरी वाचावी,” असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला. (Sanjay Gaikwad) “प्रबोधनकार ठाकरे ने लिहिलेलं आहे ते पुस्तक, ज्या प्रबोधनकरांच्या विचारावर शिवसेना चालते तुम्ही अशा प्रकारे बोलता. मला असं वाटतं एकनाथ शिंदे साहेबांनी अशा वाचाळविरांचा बंदोबस्त केला पाहिजे,” असंही अंबादास दानवे म्हणाले. Sanjay Gaikwad Ambadas Danve संजय गायकवाड काय म्हणाले? (Sanjay Gaikwad) छत्रपतींचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल जी काही मी शिवीगाळ केली होती त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली आहे. यापुढेही शिवरायांचा अपमान करणाऱ्याचा विषय असेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. येत्या विधानसभा अधिवेशनात दगलबाज, शिवाजी शिवाजी कोण होता? या पुस्तकांवर बंदी आणण्याकरता मी मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी करणार आहे. या प्रकरणात याविषयी माननीय न्यायालयाने जे काही आदेश दिले असतील, पोलिसांना सहकार्य करण्यास मी तयार आहे, असं संजय गायकवाड म्हणाले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावर आक्षेप घेत पुस्तक वितरण करणारे प्रशांत आंबी यांना कथित शिवीगाळ केली होती. याप्रकरणी गायकवाड यांनी नंतर दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र यावरून राज्यभरात मोठा वाद निर्माण झाला होता. हेही वाचा : Uorfi Javed: मेट गालातील व्हायरल ‘बबल ड्रेस’ उर्फीने केला रीक्रिएट; BTS व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली धूम