कुआला लंपूर (मलेशिया) – अमेरिकेतल्या परराष्ट्र विभागातून तब्बल १,३०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाते आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ट्रम्प प्रशासनाने सुरू केलेल्या नाट्यमय पुनर्रचना योजनेनुसार ही कर्मचारी कपात केली जाते आहे. अमेरिकेत देशांतर्गत काम करणाऱ्या १,१०७ नागरी सेवकांना आणि २४६ परराष्ट्र सेवा अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या सूचना पाठवल्या जात आहेत, असे परराष्ट्र विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. परदेशी सेवेतील प्रभावित झालेल्या अधिकाऱ्यांना ताबडतोब १२० दिवसांसाठी प्रशासकीय रजेवर पाठवले जाईल, त्यानंतर ते औपचारिकपणे त्यांच्या नोकऱ्या गमावतील. बहुतेक प्रभावित नागरी कर्मचाऱ्यांसाठी कामावरून कमी करण्याचा कालावधी ६० दिवसांचा आहे, असे त्यात म्हटले आहे. विभागीय पुनर्रचनेच्या संदर्भात, विभाग राजनैतिक प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी देशांतर्गत कामकाज व्यवस्थित करत आहे, असे सूचनेत म्हटले आहे. प्राधान्य नसलेल्या कार्यांवर, डुप्लिकेटिव्ह किंवा रिडंडंट कार्यालयांवर आणि कार्ये आणि जबाबदाऱ्यांचे केंद्रीकरण किंवा एकत्रीकरणातून लक्षणीय कार्यक्षमता आढळू शकते अशा कार्यालयांवर परिणाम करण्यासाठी कर्मचारी संख्या काळजीपूर्वक कमी केली जाते आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कर्मचारी कपातीचे स्वागत केले असून प्रशासकीय व्यवस्थेची फेररचना करण्याच्या उद्देशाने ही कपात आवश्यक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच या कपातीला मान्यता दिली आहे.