सोनम वांगचुकसह १३० आंदोलक पोलिसांच्या ताब्यात; राहुल गांधी म्हणाले, “मोदीजी, तुमचा अहंकार…”

Sonam Wangchuk । सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी सिंघू सीमेवर ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासह सुमारे 130 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोनम वांगचुक 700 किलोमीटर लांब ‘दिल्ली चलो पदयात्रे’ दरम्यान हरियाणातून दिल्लीत दाखल होताच पोलिसांनी त्यांना रोखले. त्याच्यासोबत लडाखमधील सुमारे 130 कामगारही आंदोलनासाठी दिल्लीच्या दिशेने येत होते.
या प्रकरणावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, पर्यावरण आणि संवैधानिक हक्कांसाठी शांततेने मोर्चा काढणाऱ्या सोनम वांगचुक आणि शेकडो लडाख्यांना ताब्यात घेणे अस्वीकार्य आहे. लडाखच्या भवितव्यासाठी उभ्या असलेल्या ज्येष्ठांना दिल्ली सीमेवर का अडवले जात आहे? मोदीजी, शेतकऱ्यांप्रमाणेच हे चक्रव्यूहही मोडेल आणि तुमचा अहंकारही मोडेल. लडाखचा आवाज ऐकावा लागेल.’
सोनम वांगचुकसह जवळपास 130 लोक दिल्लीत आंदोलन करण्यासाठी येत होते. यावेळी पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. वांगचुक यांच्यासह काही आंदोलकांना दिल्लीतील नरेला औद्योगिक क्षेत्र पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
#WATCH | Delhi: Visuals from outside Narela Industrial Area Police Station where activist Sonam Wangchuk and others were brought after police detained them from the Singhu border pic.twitter.com/kT69eD7IAa
— ANI (@ANI) September 30, 2024
कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुकसह सर्वांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या सर्वांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. सोमवारीच दिल्ली पोलीस आयुक्तांनी दिल्लीतील अनेक भागात बीएनएस कलम 163 लागू केले आहे, त्यानंतर 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे आणि आंदोलन करण्यास बंदी आहे.
Sonam Wangchuk । वांगचुक यांनी ताब्यात घेण्यापूर्वी व्हिडिओ पोस्ट केला होता
ताब्यात घेण्यापूर्वी सोनम वांगचुक यांनी X वर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात त्यांनी सांगितले की, आम्ही पंजाबहून दिल्लीला जात होतो, वाटेत हरियाणा आणि दिल्ली पोलिसांनी आम्हाला अडवले. आम्ही दिल्लीच्या दिशेने वाटचाल करत असताना पोलिस आम्हाला एस्कॉर्ट करत नसून एकप्रकारे रोखून धरत असल्याचे दिसते. आमच्या बसमध्ये 2 पोलिस अधिकारी आले आहेत, आम्हाला सांगण्यात येत आहे की दिल्ली सीमेवर 1000 पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पुढे काय होईल माहीत नाही. आम्हाला बसमध्ये नेले जात आहे.
I AM BEING DETAINED…
along with 150 padyatris
at Delhi Border, by a police force of 100s some say 1,000.
Many elderly men & women in their 80s and few dozen Army veterans…
Our fate is unknown.
We were on a most peaceful march to Bapu’s Samadhi… in the largest democracy… pic.twitter.com/iPZOJE5uuM— Sonam Wangchuk (@Wangchuk66) September 30, 2024
Sonam Wangchuk । सोनम वांगचुक का करत आहे विरोध?
सोनम वांगचुक 1 सप्टेंबर रोजी सुमारे 130 लोकांसह लडाख सोडले होते. यावेळी ते हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती, मनाली, कुल्लू, मंडी, चंदीगड मार्गे दिल्लीच्या सीमारेषेवर पोहोचले. वांगचुक सातत्याने लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करत आहेत.
=============





