’12 वी फेल’ अभिनेता विक्रांत मेस्सी झाला बाबा; घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

Vikrant Massey: अभिनेता विक्रांत मेस्सीचा ’12 वी फेल’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणाऱ्या विक्रांतच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले होते. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. एकीकडे विक्रांतचे सर्वत्र कौतुक होत असताना त्याने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. विक्रांतच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.
विक्रांतची पत्नी शितल ठाकूर हिने एका गोंडस मुलाला जन्माला दिला आहे. विक्रांत आणि शितल यांनी आई-बाबा झाल्याची बातमी इनस्टावर पोस्ट शेअर करत दिली आहे. ही पोस्ट व्हायरल होताच चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “आमच्या मुलाचे आगमन झाले याची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. आम्ही खूपच आनंदित आहोत. त्याला शितल आणि विक्रांतकडून खूप सारं प्रेम.”त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याचा आनंद द्विगुणीत केला आहे.
View this post on Instagram
विक्रांत आणि शीतलची लव्हस्टोरी
विक्रांत मॅसीने 24 सप्टेंबर 2023 रोजी पत्नी शीतल ठाकूरच्या प्रेग्नंसीविषयी चाहत्यांना सांगितले होते. शीतल ठाकूर आणि विक्रांत मॅसी यांनी काही काळ डेटिंग केल्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये लग्न केले. लग्नानंतर विक्रांतने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याचे वैवाहिक जीवन चांगले चालले आहे. मी माझ्या जिवलग मित्राशी लग्न केले आणि यापेक्षा चांगले दुसरे काहीही असू शकत नाही, असे अभिनेत्याने म्हटले होते.
वर्क फ्रंटवर, विक्रांत अलीकडेच विधू विनोद चोप्राच्या ’12वी फेल’ मध्ये एक उत्कृष्ट अभिनय करताना दिसला. आगामी काळातही विक्रांतची जादू पाहायला मिळणार आहे. विक्रांतकडे ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ आणि ‘सेक्टर 36’ सारखे चित्रपट आहेत.





