नगर | नगर मनमाड डबल लाईनवर धावणार १२५ किमी वेगाने रेल्वे
Updated On:

नगर, (प्रतिनिधी) – नगर ते मनमाड इलेक्ट्रीक डबल लाईन रेल्वे मार्ग प्रकल्पा अंतर्गत निंबळक ते वांबोरी या टप्प्याची चाचणी येत्या २९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ही चाचणी ताशी १२५ किलोमीटर वेगाने रेल्वे धावून घेण्यात येणार आहे.
या चाचणीसाठी अति वेगाने रेल्वे धावणार असल्याने २९ फेब्रुवारी रोजी सकाळी १२ ते रात्री आठ वाजेपर्यंत रेल्वे ट्रॅक जवळ कोणीही येऊ नये, तसेच आसपासच्या गावामधील नागरिकांना सूचित करण्यात येते की या दिवशी आपली जनावरे रेल्वे ट्रॅक जवळ सोडू नयेत.
त्याच प्रमाणे रेल्वे ट्रॅक शेजारील राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन नगरचे उप मुख्य अभियंता बांधकाम दीपक कुमार यांनी केले आहे.





