पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे. तर, दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात घेण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे प्रसिद्धीपत्रक जारी करुन देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई,कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. 2025 ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावी आणि बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा 18 ते 10 दिवस आधी घेण्याचा मंडळाचा प्रयत्न असणार आहे. दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम : मंगळवार, दि. 11 फेब्रुवारी, 2025 ते मंगळवार, दि. 18 मार्च 2025 प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : शुक्रवार, दि. 24 जानेवारी 2025 ते सोमवार, 10 फेब्रुवारी 2025 माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षा : शुक्रवार, दि. 21 फेब्रुवारी, 2025 ते सोमवार दि. 17 मार्च, 2025 प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : सोमवार, 03 फेब्रुवारी 2025 ते गुरूवार, 20 फेब्रुवारी 2025