दक्षिण आफ्रिकेतून 1 हजार प्रवासी मुंबईत; पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती
Updated On:

मुंबई – दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या सर्व प्रवाशांचा शोध सुरू असून 10 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून सुमारे 1 हजार प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी मुंबई महापालिका क्षेत्रातील लसीकरण आणि बीएमसीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आदित्य ठाकरे म्हणाले, दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या सर्व प्रवाशांचा शोध सुरू असून 10 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून 1 हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत. या सर्वांना ट्रेस केले जात आहे. जे मुंबईत आहेत, त्यांची माहिती घेतली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.




