आशियाई बॅंकेकडून महाराष्ट्राला 10 कोटी डॉलरचे कर्ज
Updated On:

नवी दिल्ली – आशियाई विकास बॅंकेने महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढावी यासाठी 10 कोटी डॉलरचे म्हणजे 749 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. या कर्जाचा उपयोग अन्नधान्याची नासाडी टाळणे आणि कृषी उत्पादनाचे नेटवर्क मजबूत करण्यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत मिळेल. या कर्जाचा उपयोग जास्तीत जास्त महिला शेतकऱ्यांना होईल याची काळजी घेण्यात येणार आहे.
या एकूण कर्जामुळे महाराष्ट्रातील दोन लाख शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सकारात्मक बदल होईल असे आशियाई विकास बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना पीक आल्यानंतर या पिकाची योग्य किंमत मिळण्यासाठी आवश्यक त्या सोई या कर्जाच्या माध्यमातून पुरविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
टॅग्स:





