“1 मिनिट 14 सेकंदाचा प्रवास…” ‘ही’ आहे सर्वात कमी अंतराची विमानसेवा ; ‘या’ देशात होते उड्डाण

कमी अंतराच्या विमान उड्डाणाबद्दल पर्यावरणवादी नेहमीच तक्रार करत असतात. त्यांच्या मते अशा उडाणांमुळे कार्बन उत्सर्जन अधिक वाढते. असे असले तरी पृथ्वीच्या पाठीवर केवळ एक मिनिट 14 सेकंदाचा प्रवास करणारी सर्वात कमी अंतराची विमान सेवा देखील आहे. स्कॉटलंड मधील वेस्ट्रे हे एक छोटेसे बेट आहे. त्याची लोकसंख्या 600 पेक्षा कमी आहे. त्याच्या जवळच पापे वेस्ट्रे नावाचे आणखी एक बेट आहे. या दोन बेटांच्या दरम्यान लोगन एअर ची फ्लाईट एल एम सेवन ही रोज उड्डाण करत असते.
ही जगातील सर्वात कमी अंतराची फ्लाईट मानली जाते. हे विमान दोन बेटा दरम्यान दिवसातून दोन ते तीन वेळा फेऱ्या मारते. या विमानातून प्रामुख्याने पर्यटक आणि ज्यांना सर्वात कमी अंतराचा विमान प्रवास अनुभवायचा आहे असे हौशी लोक प्रवास करतात. दोन बेटातील अंतर हे विमान जवळपास 53 सेकंदात पूर्ण करते. उरलेला वेळ त्याला उड्डाण आणि लँडिंग साठी लागतो.
विमानातील अन्नपदार्थांची नकोशी का वाटते?
विमानातून प्रवास करताना जेव्हा विमान तीस हजार फूट उंचीवरून जात असते तेव्हा केबिनवर प्रचंड दबाव असतो. तसेच विमानात कोरडी हवा असते. त्यामुळे प्रवाशांच्या जिभेवरील चवीच्या ग्रंथी या 30 टक्के कमी काम करू लागतात आणि त्यामुळे एअरलाइन कंपनीने कितीही चविष्ट फूड दिले तरी ते प्रवाशांना आवडतेच असे नाही.
कोरोना नंतरचे सर्वात व्यस्त विमानतळ
अमेरिकेतील अटलांटा इंटरनॅशनल एअरपोर्ट हे पृथ्वीच्या पाठीवरील सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून 24 वर्षे अव्वल स्थानावर होते. मात्र करोनाच्या काळात अटलांटा इंटरनॅशनल एअरपोर्टचा हा मान चीनमधील ग्वान्गाझू बेयून इंटरनॅशनल एअरपोर्ट ने तात्पुरता हिरावून घेतला होता. 2020 मध्ये या विमानतळावरून 43 कोटी सात लाख 67 हजार 558 प्रवाशांनी प्रवास केला. वार्षिक प्रवासी संख्येबाबत 2021 मध्ये अटलांटा इंटरनॅशनल एअरपोर्ट ने पुन्हा पहिले मानांकन मिळवले.
चाचणीसाठी चिकनगन
एअरलाइन्स कंपन्या चाचणीसाठी चिकनगन वापरतात. जेव्हा विमानाच्या कॉकपिटच्या काचेवर किंवा इंजिनवर एखादा पक्षी जोराने आढळतो, त्या घटनेच्या परिणामांची चाचणी घ्यायची असेल तर त्यासाठी चिकनगनचा वापर केला जातो. सुरक्षेसाठी 1940 पासून आज पर्यंत कॉम्प्रेस्ड एअर कॅनन ज्यांना चिकनगन म्हटले जाते अशांचा वापर केला जातो. या चिकनगनद्वारे मृत पक्षाचा सांगाडा जोरदार वेगाने जेट इंजिन आणि कॉकपिटच्या काचेवर फेकला जातो आणि त्यातून मग इंजिन आणि कॉकपिटची काच हा मारा कितपत सहन करू शकते याची चाचणी केली जाते. अशा चिकनगनचा वापर 1942 मध्ये करण्यात आला. ही चिकनगन पक्षाचा सांगाडा ताशी 640 किलोमीटर वेगाने इंजिन वर किंवा कॉकपिटच्या वेळेवर फेकते.





