वाहनाच्या धडकेत युवक ठार
Updated On:

कराड -पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मालखेड फाटा, ता. कराड येथे बुधवारी (दि. 19) मध्यरात्री 1 च्या सुमारास वाहनाच्या धडकेत निखिल भिकाजी शेळके (वय 23, रा. निमोडी, ता. खंडाळा) हा ठार झाला. याबाबत माहिती अशी, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना निखिल शेळके यास एका वाहनाची धडक बसली. या अपघातात जबर जखमी झालेल्या निखिलला महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कराड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस नाईक साळुंखे तपास करत आहेत.





