SIMBEX Military Exercise : सिनबॅक्स लष्करी सरावासाठी भारतीय तुकडी कंबोडियाला रवाना
भारत-कंबोडिया द्विपक्षीय लष्करी सरावाची दुसरी आवृत्ती सिनबॅक्स-२ साठी (SIMBEX Military Exercise) भारतीय लष्कराची एक तुकडी रवाना झाली आहे.

SIMBEX Military Exercise : भारत-कंबोडिया द्विपक्षीय लष्करी सरावाची दुसरी आवृत्ती सिनबॅक्स-२ साठी (SIMBEX Military Exercise) भारतीय लष्कराची एक तुकडी रवाना झाली आहे.
हा सराव ४ ते १७ मे या कालावधीत कंबोडियातील, कंम्पोंग स्पेयू प्रांतातील, टेको सेन फ्नोम थॉम म्रीस प्रॉव रॉयल कंबोडियन (SIMBEX Military Exercise) हवाई दल प्रशिक्षण केंद्रात आयोजित केला जाईल.
कंबोडियासोबतचा हा सिनबॅक्स-२ सरावामध्ये (SIMBEX Military Exercise) निम-पारंपारिक वातावरणात लष्करी मोहिमा राबवण्यासाठी कंपनी स्तरावरील संयुक्त प्रशिक्षण दिले जाईल.
भारतीय लष्कराच्या या तुकडीत १२० सैनिकांचा समावेश असून, त्यातील बहुतांश सैनिक मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटच्या एका बटालियनचे आहेत, तर कंबोडियाकडून रॉयल कंबोडियन आर्मीच्या १६० सैनिकांचा समावेश असेल.
हा संयुक्त सराव संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांवर आधारित असेल. यामध्ये शांतता सैनिकांना सध्या ज्या प्रकारच्या दहशतवादविरोधी कारवायांना सामोरे जावे लागते, त्याचा सराव केला जाईल. विविध चर्चा आणि सामरिक सरावांच्या माध्यमातून हे ध्येय साध्य केले जाईल. शेवटी एका सर्वसमावेशक प्रमाणीकरण सरावाने या प्रशिक्षणाचा समारोप होईल.






