मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दरे तांब येथे मुक्कामी दौरा
Updated On:

पाचगणी – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब या त्यांच्या गावी दोन दिवसाच्या मुक्कामी दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी हेलिकॉफ्टने दुपारी 2 वाजता त्यांचे दरे तांब येथे आगमन झाले. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारे, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, तहसीलदार सुषमा पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी ना. एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. दरे तांब येथे ना. एकनाथ शिंदे दोन दिवस थांबणार असून त्यांना भेटण्यासाठी जिल्ह्यातील अनेकांनी दरे तांब येथे गर्दी केली होती.





