Cockroach Janata Party : युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे.! कॉक्रोच जनता पार्टीला अण्णा हजारेंचा पाठिंबा, काय म्हणाले एकदा पाहाच…
नाव योग्य नसेल तरी झुरळ पार्टीच्या मागे देशातील तरुण उभा राहिला हे महत्त्वाचे आहे. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे.

Cockroach Janata Party – एकेकाळी अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचा भाग राहिलेल्या अभिजीत दिपकेच्या पक्षाबाबत अण्णा हजारेंना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी कॉक्रोज जनता पार्टीचे समर्थन केले आहे. झुरळ हे नाव योग्य नसले तरी देशातील जनता या पार्टीच्या पाठीशी उभी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
अण्णा हजारे म्हणाले, झुरळ हे नाव योग्य नसले तरी देशातील जनता या पार्टीच्या पाठीशी उभी आहे. मुळात हे समजून घेतले पाहिजे की, या पार्टीने झुरळ म्हणण्याचा उद्देश काय होता?
नाव योग्य नसेल तरी झुरळ पार्टीच्या मागे देशातील तरुण उभा राहिला हे महत्त्वाचे आहे. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे, या दोन्हीचा संगम होतो तेव्हा सरकारने त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला.
या वक्तव्यावरुन भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी लवकरच अण्णा हजारे यांची भेट घेणार आहे, अनेक वर्षांपासून त्यांची माझी भेट नाही, असे महाजन यांनी म्हटले. मात्र, कॉक्रोच जनता पार्टी आणि लोकायुक्त अंमलबजावणीसंदर्भातील वक्तव्यावर उत्तर देणे त्यांनी टाळले.






