Ramrao Wadkute : खासदार रामराव वडकुते यांचे पार्थिव छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल
भाजप पदाधिकाऱ्यांकडून अंत्यदर्शन

Ramrao Wadkute : भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे पार्थिव दिल्लीवरून छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले. यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते विमानतळावर उपस्थित होते. आमदार गोपीचंद पडळकर, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि आमदार नारायण कुचे यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. (Ramrao Wadkute)
यानंतर छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून रुग्णवाहिकेद्वारे पार्थिव परभणीकडे रवाना करण्यात आले. परभणीतील कल्याण नगर येथील त्यांच्या निवासस्थानी नागरिकांना अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या, २४ नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, २२ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना रामराव वडकुते यांचे निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.





