Petrol Diesel Shortage : ‘या’ लोकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही; थेट जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश
युद्धामुळे जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाचा (Petrol Diesel Shortage) परिणाम भारतावर होत असून, महाराष्ट्रातही इंधन टंचाईचे सावट गडद होत आहे.

Petrol Diesel Shortage : युद्धामुळे जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाचा (Petrol Diesel Shortage) परिणाम भारतावर होत असून, महाराष्ट्रातही इंधन टंचाईचे सावट गडद होत आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल-डिझेलसाठी (Petrol Diesel Shortage) लांबच लांब रांगा लागत आहेत. यात जालना जिल्ह्यात इंधन कमतरता निर्माण झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे महत्त्वाचे आदेश
जालना जिल्ह्यात इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी पेट्रोल पंप चालकांसाठी कठोर निर्देश जारी केले आहेत.
– सर्व पेट्रोल पंपांनी ५ टक्के इंधन साठा राखीव ठेवावा.
– कॅन, बॉटल किंवा बॅरल मध्ये पेट्रोल-डिझेल विक्री करू नये.
– काळ्या बाजारात इंधन विक्री आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “काळ्या बाजार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारे बॉटल-कॅनमध्ये इंधन घेणाऱ्या लोकांना आता इंधन मिळणार नाही.” त्याचबरोबर नागरिकांना आवाहन करताना आशिमा मित्तल म्हणाल्या, “इंधन टंचाईच्या (Petrol Diesel Shortage) काळात काळजीपूर्वक वापर करा. शक्यतो अनावश्यक प्रवास टाळा.”
रत्नागिरीतही भीषण टंचाई
दुसरीकडे रत्नागिरी शहरातही इंधन टंचाईने हाहाकार माजला आहे. शहरातील चार प्रमुख पेट्रोल पंप पूर्णपणे रिकामे झाले आहेत. मुख्य पेट्रोल पंपांवर ‘पेट्रोल-डिझेल संपले’ असे बोर्ड लागले आहेत.
माळ नाका येथील जयस्तंभ पेट्रोल पंपावर फक्त पॉवर पेट्रोल (११९.२४ रुपये प्रति लिटर) उपलब्ध आहे. दोन दिवसांपासून या पंपावर साध्या पेट्रोलचा टँकर आलेला नाही. वाहन चालकांना नाईलाजाने महागड्या पॉवर पेट्रोलची खरेदी करावी लागत आहे, ज्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रशिया-युक्रेन युद्धासह जागतिक स्तरावरील विविध घटनांमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. याचा परिणाम भारतातील इंधन पुरवठ्यावर होत असून, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.






